Curly Hair: तुमचेही कुरळे केस आहेत? मग किटमध्ये 'या' गोष्टी ठेवल्याच पाहिजे

जर तुमचे केस कुरळे असतील तर तुमच्या किटमध्ये काही प्रोडक्ट असणे गरजेचे असते.
Curly Hair
Curly HairDainik Gomantak
Published on
Updated on

Curly Hair tips essential products for curly hair read full story

ज्याप्रमाणे प्रत्येक महिलेची त्वचा वेगळी असते, त्याचप्रमाणे केस देखील इतरांपेक्षा वेगळे असतात. काहींचे केस सरळ किंवा कुरळे असतात. जर तुमचे केस कुरळे असतील आणि त्यांची योग्य काळजी न घेतल्याने ते अधिक कोरडे दिसतात. यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कुरळे केसांसाठी तुम्हाला बाजारात अनेक प्रोडक्ट मिळतील, पण तुमच्यासाठी कोणते प्रोडक्ट योग्य आहे हे जाणून घ्यावे आणि मगच वापरावे.

  • कंडिशनर वापरा

अनेक वेळा आपण कंडिशनर वापरत नाही. पण कुरळे केस असलेल्या लोकांचे केस थोडे कोरडे असतात. यामुळे केसांना मॉइश्चरायझिंग कंडिशनर वापरणे आवश्यक आहे. हे तुम्हाला तुमचे कर्ल हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

  • हीट स्टायलिंग टूल

अनेकदा आपण आपले केस स्टाईल करण्यासाठी ब्लो ड्रायर, फ्लॅट आयरन किंवा कर्लिंग आयरन यांसारखी हीट स्टाइलिंग टूल वापरतो. पण तुमचे केस कुरळे असतील तर हिटिंगमुळे तुमचे कुरळे केस खराब होणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या किटमध्ये हिट प्रोटेक्टर स्प्रे किंवा सीरम ठेवणे गरजेचे आहे.

  • सल्फेट फ्री शॅम्पू

जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पू वापरला पाहिजे. सल्फेट्स असलेले शॅम्पू तुमचे केस अधिक चांगले स्वच्छ करतात. परंतु ते तुमच्या केसांचे नैसर्गिक तेल देखील काढून टाकू शकतात. तुमचे कुरळे केस आणखी कोरडे आणि कुरळे होतात. तुमच्या केसांचा प्रकार लक्षात घेऊन सौम्य आणि हायड्रेटिंग शैम्पू वापरावा. यामुळे तुमच्या कुरळ्या केसांचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

  • लीव्ह-इन कंडिशनर

कुरळे केस असलेल्या लोकांनी त्यांच्या हेअर किटमध्ये कंडिशनर नक्की ठेवावे. हे तुमच्या कर्लला अतिरिक्त आर्द्रता आणि हायड्रेशन प्रदान करते. जर तुम्हाला फ्रिझी केसांचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला तुमच्या कर्लला चमकदार आणि आकर्षक लुक द्यायचा असेल, तर लीव्ह-इन कंडिशनर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

  • स्टाइलिंग जेल

कर्ल क्रीम किंवा स्टाइलिंग जेल देखील कुरळे केसांसाठी फायदेशीर आहे. ही प्रोडक्ट केसांमधली फ्रिजनेसपणा कमी करण्यासाठी मदत करतात. जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करता तेव्हा तुमचे कुरळे केस खूप सुंदर दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com