Christmas 2023: ख्रिसमस अन् नवीन वर्षाच्या पार्टीतील हँगओव्हर टाळायचाय? मग वापरा माइंडफुल ड्रिंकिंग

Christmas 2023: माइंडफुल ड्रिंक म्हणजे काय आणि पार्टीमध्ये त्याचे पालन कसे करावे हे जाणून घेऊया.
New year Party| Christmas Party| Hangover
New year Party| Christmas Party| HangoverDainik Gomantak
Published on
Updated on

Christmas 2023 Mindful Drinking: ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीसाठी लोक खूप उत्सुक असतात. घरची पार्टी असो किंवा बाहेरची पार्टी लोकांना नाचायला, गाणं म्हणायला, विविध स्वादिष्ट पदार्थ खाणे आणि पिणे खूप आवडते.

पार्टीत अल्कोहोल दिली जाणार असेल तर हँगओव्हर होण्याची पूर्ण शक्यता असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डोकेदुखी आणि दिवसभर अस्वस्थ वाटते. म्हणून जर तुम्हाला पार्टीच्या दुसऱ्या दिवशी हा त्रास नको असेल तर माइंडफुल ड्रिकिंग करावे.

जे आजकाल पार्ट्यांमध्ये अशा लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जे फिटनेसची काळजी घेतात आणि पार्टीचा आनंद देखील घेतात. माइंडफुल ड्रिंक म्हणजे काय आणि पार्टीमध्ये त्याचे पालन कसे करावे हे जाणून घेऊया.

  • माइंडफुल ड्रिकिंग म्हणजे काय?

माइंडफुल ड्रिकिंगमध्ये ड्रिंक पूर्णपणे सोडून द्यावी लागत नाही तर विचार करून मर्यादेत सेवन करावे लागते. यामुळे तुम्हाला पार्टींचा आनंद घेता येईल आणि दुसऱ्या दिवशी हँगओव्हरचा त्रास देखील होणार नाही. अशा प्रकारच्या ड्रिंकिंगचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

असे करावे माइंडफुल ड्रिकिंग

  • अनकम्फर्टेबल झाल्यावर ड्रिंक घेणे टाळा

ड्रिंक घेताना एक एक सीप घ्यावा. हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुम्हाला ड्रिंकचा आनंद देखील घेता येईल. तसेच हँगओव्हरचा धोका देखील राहणार नाही. तुम्हाला जर अनकम्फर्टेबल झाल्यासारखे वाटत असेल तर ड्रिंक घेणे टाळावे.

  • लिमिट सेट करावी

ख्रिसमस किंवा नव्या वर्षाच्या पार्टीला जाण्यापूर्वी तुम्हाला किती ड्रिंक करायचे आहे ते स्वतःच ठरवावे. तुम्ही ठरवलेली मर्यादा कोटेकोरपणे पाळावी. यामुळे हँगओव्हरचा धोका राहणार नाही.

  • मित्रांच्या दबावाखाली येऊ नका

पार्टीत ड्रिंक पिण्यासाठी मित्रांना साथ देण्यासाठी किंवा कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. जर तुम्ही पार्टीत ड्रिंक पिण्यासाठी मर्यादा ठरवली असेल तर ती काटेकोरपणे पाळवी.

  • हँगओव्हर कसे कराल कमी

तुम्हाला जर हँगओव्हर झाल्यासारखे वाटले तर लिंबु पाणी पिऊ शकता. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्यावे त्यात अर्धा चमचा मीठ टाकावे. ते चांगले मिक्स करावे आणि प्यावे. यामुळे तुम्हाला हँगओव्हरमुळे होणार त्रास कमी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com