Car Interior Cleaning Tips: जर कार आतून स्वच्छ असेल तर सकाळी दिवसाची सुरुवात करताच तुम्हाला चांगले वाटते. आपण गाडी रोज बाहेरून कापडाने पुसतो पण आतून नीट साफ करू शकत नाही. कारला आतून केमिकल वॉश करणे महागत पडते. यामुळे घरात ठेवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी वापरल्या तर गाडी स्वच्छ होते आणि पैशांचीही बचत होते.
स्वच्छता करण्यापूर्वी 'हे' करा
अनेकदा थंड किंवा दमट हवामानात गाडीत वास येऊ लागतो. याशिवाय रोजच्या वापरामुळे स्टेअरिंग, गेट यासारख्या गोष्टींवर धुळ साचते. कारच्या आतील बाजूस साफ करण्यापूर्वी, मॅट्स बाहेर काढा आणि त्यातील धूळ साफ करा. मॅट्स ओल्या कापडाने किंवा पाण्याने आणि शैम्पूने देखील धुता येते. यानंतर, आतून फ्लोर स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग ब्रश वापरा किंवा तुमच्याकडे दुसरे काही नसेल तर ओल्या कापडाने फ्लोर स्वच्छ करा. स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ कापड किंवा मायक्रोफायबर कापड वापरा.
बेकिंग सोडा वास दूर करेल
गाडीचा फ्लोर स्वच्छ केल्यानंतरही जर त्यातून वास येत असेल तर फ्लोर टाकण्यापूर्वी त्यावर थोडा बेकिंग सोडा टाका. याशिवाय गाडीच्या सीटवरील डाग साफ करायचे असतील तर बेकिंग सोड्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डागावर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. त्यानंतर दहा मिनिटांनी मऊ कापड ओले करून स्वच्छ करा.
डॅशबोर्ड स्वच्छ करणे महत्वाचे का आहे?
कारचा डॅश बोर्ड, स्टीयरिंग व्हील आणि ड्रायव्हर डिजिटल डिस्प्ले ओल्या कापडाने स्वच्छ करता येतो. ते स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात बाटलीत मिक्स करावे. मग ते कापडावर लावून किंवा बाटलीत फवारणी करून तुम्ही कारची खिडकी, बटणे आणि इतर भाग कापडाने स्वच्छ करू शकता. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही केस धुण्यासाठी शैम्पू किंवा कोणतेही जंतुनाशक वापरू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.