Makar Sankranti: बालकांच्या 'बोरन्हाण'ची अनोखी प्रथा, जाणून घ्या शास्त्रीय कारण

मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही कळात बोरन्हाण घाललं जाऊ शकतं.
Makar Sankranti
Makar SankrantiDainik Gomantak
Published on
Updated on

तीळगुळ घ्या गोडगोड बोळा असे म्हणून प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरूवातीला मकर संक्रात हा पहिला सण साजरा केला जातो. महिलांसाठी विशेष महत्व असलेल्या या सणात लहान मुलांसाठी एक खास विधी करण्याची प्रथा आहे.

'बोरन्हाण' असे या प्रथेचे नाव असून, अजूनही अनेक ठिकाणी हा विधी केला जातो. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी ही बोरन्हाण घालण्याची पारंपारिक पद्धत आहे. शिवाय याला विधीला शास्त्रीय कारण देखील आहे.

मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही कळात बोरन्हाण घाललं जाऊ शकतं.

Makar Sankranti
Health Tips : आजारापासून दूर राहण्यासाठी सारखं गरम पाणी पिताय ? मात्र तेच ठरू शकत आजाराचं कारण, वाचा सविस्तर

'बोरन्हाण' घालण्यामागे काय आहे शास्त्रीय कारण?

मकर संक्रातीच्या काळात वातावरणात अधिक बदल होत असतात. मुलांच्या आरोग्याला बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी बोरं, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे तुकडे, चिरमुरे, हरभरा, तिळाच्या रेवड्या यासारखे पदार्थ मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात.

विधी सुरू असताना काही लहान मुले देखील बाजुला बसलेली असतात. फळे खाली पडल्यानंतर कुतूहलापोटी ती वेचून खाल्ली जातात. फळे खाल्याने पुढील वातावरणासाठी मुलांचे आरोग्य सदृढ राहते असे यामागे शास्त्रीय कारण सांगितले जाते.

अलिकडे बोरन्हाण घालताना हल्लीच्या मुलांना आवडणारे पदार्थ घातले जातात. विविध पौष्टिक पदार्थ आणि फळे यानिमित्ताने मुलांना स्वत:च खायला लावणे हे देखील कारण यामागे सांगितले जाते.

Makar Sankranti
Yoga : 'हे' आसन रोज केले तर केस गळतीपासून होईल सुटका, वाचा...
Makar Sankranti
Makar SankrantiDainik Gomantak

छोटेखानी घरगुती सोहळा

लहान मुलांचे बोरन्हाण हा एक छोटेखानी आणि घरगुती सोहळा आहे. मुलांना यावेळी काळ्या रंगाचे कपडे घातली जातात. तसेच, हलव्याचे दागिने देखील घातले जातात.

जवळच्या नातेवाईकांना देखील या सोहळ्यासाठी बोलवले जाते. मुलांना पाठावर बरवून त्यांचे औक्षण केले जाते आणि त्यांनतर हा विधी केला जातो. यावेळी घरी आलेल्या सुवासिनींचा हळदीकुंकू समारंभ पार पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com