Coconut Use: फक्त आरोग्यासाठीच नव्हे, 'या' घरगुती कामांसाठीही नारळ ठरतो फायदेशीर

नारळाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो.पण तुम्हाला नारळाच्या सालींचा वापर हा घरगुती कामांसाठा करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का?
Coconut Use
Coconut UseDainik Gomantak

Coconut Use: तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे नारळ मिळतील, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कच्चे किंवा सुके नारळ खरेदी करू शकता. नारळ कच्चा खाण्याव्यतिरिक्त तुम्ही त्याचा वापर मिठाई आणि चटण्या बनवण्यासाठी देखील करू शकता. मिठाई, चटणी आणि प्रसादाव्यतिरिक्त तुम्ही स्वयंपाकघरात नारळाचा अनेक प्रकारे वापर करू शकता. तुम्हाला फक्त ते कसे वापरायचे हे माहित असणे आवश्यक आहे. जेवण चविष्ट बनवण्याबरोबरच त्याची साल देखील खूप उपयुक्त आहे, जी तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. जर तुम्हाला नारळापासून पदार्थ बनवण्याव्यतिरिक्त त्याचे इतर उपयोग माहित नसतील तर आज आम्ही तुम्हाला त्याचे इतर उपयोग सांगणार आहोत.

स्क्रबर

आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले स्क्रबर वापरले असेलच. पण तुम्हाला माहितीय का की नारळाच्या शेंड्यापासून देखील स्क्रबर बनवला जातो. यासाठी वाळलेले नारळ घेऊन त्याच्या शेंड्या काढाव्या.नंतर ते एका धाग्याने बाधांव्या.काही वेळ पाण्यात भिजत ठेवावे. नंतर भांडी घासण्यासाठी तुम्ही स्क्रबर म्हणून वापरू शकता.

फोडणी देण्यासाठी

तुम्ही सर्वांनी अनेक प्रकारची पेये, मिठाई आणि नारळापासून बनवलेल्या चटण्या चाखल्या असतील. कढीपत्ता, जीर आणि मोहरी टाकून गरम तेलाचा तडका नारळाच्या चटणीमध्ये टाकल्यास त्याची चव जास्त वाढते.

नारळाची वाटी

नारळाची साल निरुपयोगी म्हणून फेकून देण्याऐवजी, आपण क्रॉकरी बनवून त्यांचा सुंदर वापर करू शकता. नारळाची साल ​​फोडावी देण्यासाठी आणि वाटी किंवा कप म्हणून वापरू शकता. तसेच नारळाची कवचापासुन सजावटीच्या वस्तु,फुलदाणी, पेन स्टॅड असे अनेक वस्तु बनवु शकता.

जाळ करण्यासाठी

नवरात्री दरम्यान किंवा हवनासाठी वाळलेल्या नारळाच्या शेड्यांचा वापर केला जातो. यामुळे जाळ लवकर होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com