जर तुम्ही मुंबई गोवा हायवेवर प्रवास करत असाल तर चिपळूणजवळ हे खास जलमंदिर नक्की पाहा.
चिपळूण सावर्डा फाट्यापासून पुढे शिरंबे गाव लागेल तेथे हे सुंदर मंदिर आहे.
पाण्याने भरलेल्या चौकोनी कुंडामध्ये श्री मल्लिकार्जुन भगवानाचे हे मंदिर वसवलेले आहे.
महाराष्ट्रात जी काही मोजकी जलमंदिर आहेत त्यातील हे एक मंदिर आहे .
कुंडाची रचना विशिष्ट आहे. पाणी मर्यादेच्या वर गेले की आपोआप दुसऱ्या कुंडात पाणी वळवले जाते.
सदर मंदिरातील शिवपिंडी १४०० वर्ष जुनी असून शिवकाळात छत्रपती शिवरायांनी मंदिरासाठी विशेष रक्कम अदा केली आहे असे स्थानिक सांगतात.
मंदिराच्या सभोवताली श्री वरदान मंदिर, श्री चंडिका देवी यांची स्वतंत्र मंदिरे आहेत .
मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ गणपती उत्सव ते दिवाळी या दरम्यानचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.