गोवा (Goa) हे जगातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ (Tourist Places) आहे. गोव्यात फक्त समुद्रकिनारे (Beach) आणि डिस्कोमध्ये जाण्याव्यतिरिक्त येथे अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, जी पर्यटकांचे (Tourist) लक्ष वेधून घेतात. त्यामुळे गोव्यात (Goa) फिरायला जाण्याचा प्लॅन (Plan) करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.
* Mae De Deus Church
मदर ऑफ गॉड चर्च (Mother Of God Church) हे उत्तर गोव्यात (North Goa) आहे. चर्च ही एक सुंदर गॉथिक रचना आहे. यांचे बांधकाम 1873 मध्ये झाले. या ठिकाणी अनेक पर्यटक (Tourist) आकर्षित होतात.
* Aguada Fort
आग्वाद किल्ला 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि दीपगृह आहे. हे सिंक्वेरिम बिचवर असलेल्या वसलेले आहे. हा किल्ला मुळत: डच आक्रमणाविरुद्ध बांधला गेला होता. गोव्यातील (Goa) एक भव्य प्रेक्षणीय भव्य स्थळ म्हणून ओळखले जाते.
* Dudhsagar Falls
गोव्यातील दूधसागर धबधबा हे अनेक पर्यटकांचे मन वेधून घेणारे ठिकाण आहे. मंडोवी नदीवर वसलेले आहे. तुम्ही येथे जीप सफरीचा आनंद घेवु शकता. पण तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर येथे तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी जावु शकता.
* Ancestral Goa Museum
गोव्याचे हे एक अनोखे संग्रहालय आहे. येथे तुम्हाला गोव्याचे जुने मार्ग, गोवन लोकांच्या चालीरीती पाहायला मिळतील. येथे तुम्हाला रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर आणि बऱ्याच गोष्टीचा आनंद घेता येईल.
* Basilica Of Bom Jesus
हे एक अविश्वसनीय चर्च (Church) असून यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ही सुंदर वास्तुकला 1605 पासून आहे. हे रोमन कॅथोलिक बॅसिलिका ख्रिश्चन धर्माच्या इतिहासात एक महत्वाची खूण असल्याचे म्हटले जाते. गोव्यातील एक अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.