इंडियन प्रीमियर लीग हे नेहमीच खेळाडूंमधून सर्वोत्कृष्ट खेळ घडवून आणणारे रणांगण म्हणून ओळखले जाते. IPL 2022 मध्ये सध्या ही क्रिया सर्वकालीन उच्च पातळीवर असताना, येथे क्रिकेटपटूंचे काही स्वॅग्स देखील बघायला मिळतात. क्रिकेटपटूंचे आवडते जवळचे व्यक्ती आपल्या टिमला समर्थन देतांना चिअर करताना दिसतात.
अनुष्का शर्मा
आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात फाफ डू प्लेसिसचा संघ गुजरात टायटन्सकडून हरला असला तरी विराट कोहलीने आपला गमावलेला फॉर्म परत मिळवला. त्याने 53 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 58 धावांची खेळी खेळली. खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होती आणि प्रत्येक चांगल्या शॉर्टवर टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होती.
दीपिका पल्लीकल
भारताची स्टार स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल तिचा पती दिनेश कार्तिकला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमध्ये दिसली कारण ती तिच्या ऑफ सीझनचा आनंद घेत होती. आरसीबी विरुद्ध जीटी सामन्यात ती अनुष्कासोबत बंगळुरूला चीअर करत होती.
रितिका सजदेह
रोहित शर्मा आयपीएल 2022 मध्ये फॉर्ममध्ये नाही, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग 8 सामने गमावल्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पण त्याच्या वाढदिवशी संघाने त्याला विजयाची भेट दिली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी रितिका सजदेहही स्टेडियमवर होती.
नतासा स्टॅनकोविच
नतासा नेहमीच आपल्या टिमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमला राहते. आणि तिच्या पोशाखाच्या देखील चर्चा होते. ती गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला चिअर करायला येते. तिथे ती जल्लोष करताना दिसते.
अथिया शेट्टी
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलची मैत्रीण आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि तिचे वडील सुनील शेट्टी त्यांच्या कुटुंबासह वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सचा जयजयकार करताना दिसली. मात्र, त्या सामन्यात केएल राहुल गोल्डन डकला बळी पडला आणि एलएसजीला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.