मक्तेदारी: जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचे मक्तेदारी राहिली आहे. अमेरिकेने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय प्रगती केली आहे.
भारत: भारतासारखे विकसनशील देश आता तंत्रज्ञानाच्या बाबातीत अमेरिकेला टक्कर देत आहेत.
ग्लोबल रिसर्च पॉवर हाउस: भारत आता ग्लोबल रिसर्च पॉवर हाउस बनला असल्याचा रिपोर्ट ऑस्ट्रेलियन स्ट्रेटजिक पॉलिसी इंस्टीट्यूटने दिला आहे. या प्रकारात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आला आहे.
रिपोर्ट: ऑस्ट्रेलियन स्ट्रेटजिक पॉलिसी इंस्टीट्यूटने 2023 चा रिपोर्ट पब्लिश केला आहे. त्यात म्हटले आहे की, 64 क्रिटिकल तांत्रिक क्षेत्रापैकी 45 क्षेत्रात भारत जगातील टॉप पाच देशांमध्ये आहे.
तंत्रज्ञानाची 7 क्षेत्रे: तंत्रज्ञानाच्या 7 क्षेत्रात भारताने दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यात बायोलॉजिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्यूटेड लेजर यासारख्या विभाग आहेत.
भारत मास्टर: आर्टिफिशियल इंटेलीजेन्सच्या (एआय) क्षेत्रात भारताची प्रगती वेगाने होत आहे. या क्षेत्रात भारताने जगातील सर्वच मोठ्या देशांना मागे सोडले आहे.
तिसरा क्रमांक: आर्टिफिशियल इंटेलीजन्समध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एआयमध्ये भारताच्या पुढे चीन अन् अमेरिकाच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.