राज्यात आजपासून (28 ऑक्टोबर) दिवाळीला सुरुवात झाली. एकीकडे दिवाळीची लगबग सुरु असताना दुसरीकडे पावसानं हाहाकार उडवला. पावसानं लावलेल्या हजेरीनं सगळ्यांचीच तारांबळ उडाली.
वादळीवारा आणि ढगांच्या गडगडाटासह सोमवारी (28 ऑक्टोबर) संध्याकाळी डिचोलीत पावसानं हजेरी लावली. ऐन दिवाळीत पावसानं हजेरी लावल्यामुळे डिचोलीतील व्यापारी वर्ग चिंतेत आहे.
गोव्यात दिवाळीला नरकासूर दहनाची मोठी परंपरा आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नरकासूर भिजले. पावसानं नरकासूर तयारीवर पाणी फेरलं.
आल्तिनो, पणजी येथे हनुमान मंदिराजवळ एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. अग्निशामन दलाकडून रस्त्यावरुन झाड हटवण्याचे काम सुरु आहे.
पणजीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. हाऊसिंग सोसायट्यांमध्ये पाणी गुडघ्यापर्यंत साचलेले दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.