Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Daily Horoscope 06 November 2024: आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
Daily Horoscope 06 November 2024: आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
Rashi Bhavisha 06 November 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

आजचे राशिभविष्य

मेष: व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तोंडात साखर ठेऊन वावरावं लागेल. आजच्या दिवशी जोडीदाराकडून मिळालेला सल्ला मौल्यवान ठरेल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

वृषभ: राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. पार्ट टाइम व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच एक चांगली सुरुवात कराल.

मिथुन: आज पैशांचा व्यवहार जरा जपून करावा. लहान मुलांकडून आज चांगली वार्ता ऐकाल. दूरच्या प्रवासासाठी निघाला असाल तर मौल्यवान वस्तू जपून ठेवा.

कर्क: आजच्या दिवशी विद्यार्थी यशस्वी होतील. भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह: आज कामाच्या ठिकाणी डोक्यावर बर्फ ठेऊन वावरा. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळतील. नवीन वाहन किंवा जमीन विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

कन्या: कोणासोबत भागेदारीत व्यवसाय करत असाल तर फायदा होईल. घरगुती वादांवर पूर्णविराम लागेल. नोकरीच्या संदर्भातील कामे पूर्ण होतील.

तूळ: जुनी कर्ज फेडून पूर्ण कराल. राजनैतिक लोकांना आज समर्थन मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: नवीन व्यवसाय सुरु कराल, मात्र शेअर बाजारात आज पैसे गुंतवण्याचा विचार करू नये. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम.

धनु: कोणतेही काम मन लावून केल्यास नक्कीच फायदा होईल. काही लोकं तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील ती वेळ सांभाळून घ्या. कोणाला आर्थिक मदत करणार असाल तर विचारपूर्वक करा.

मकर: आज मित्रांकडून मदतीची अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंग होईल. कामात वरिष्टांमुळे काही चिंताजनक प्रसंग निर्माण होऊ शकतात.

कुंभ: आज नक्कीच आनंदवार्ता ऐकायला मिळेल. प्रवास करावा लागू शकतो. परिवारासोबत आजचा दिवस आनंदाने घालवाल.

मीन: आज नवीन मित्र बनवाल. मुलांबद्दल काहीशी चिंता जाणवू शकते. आईकडून विशेष सहकार्य मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com