(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)
शनिवार,२६ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.
तिथि- दशमी २९l२३
रास- कर्क
नक्षत्र- पुष्य ०७l३८
योग - शुभ २९l२५
करण - तैतिल १४l३४
सूर्योदय - ०६:३८
चंद्रोदय - २६:१९
दिनविशेष - १६.प.चांगला
मेष - भागीदारी संदर्भातील कामे होतील, व्यवसायात फायदा चांगला होईल, पित्याकडून लाभ होईल.
वृषभ - हरावलेले धन प्राप्त होऊ शकते, वृद्ध नातेवाईकांची भेट होईल, दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता किंवा तशी बातमी मिळेल.
मिथून - व्यवसाय निमित्ताने किंवा यात्रेसाठी दूरचा प्रवास संभवेल, एकटेपणा जाणवेल, बदली करण्याची इच्छा होईल. प्रवास सुखकर असेल तरीही वाहने सावकाश चलवावित.
कर्क - कामामध्ये छान फायदा होईल,आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील, कष्ट थोडे जास्त होतील परंतु त्यातून लाभ देखील उत्तम प्रकारे होईल.
सिंह - मित्रमंडळी भेटतील, स्नेही लोकांची मदत मिळेल, कामासाठी केलेले प्रयत्ने सफल होतील, कुटुंबासाठी खर्च कराल, आरोग्य सांभाळावे हॉस्पिटल इत्यादी होण्याची शक्यता दिसते.
कन्या - थोडासा मानसिक त्रास होईल, फार आळस निर्माण होईल, प्रयत्ने निष्फळ होतील. अध्यात्मात प्रगती करावी, मार्ग मिळेल.
तूळ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, नोकरीच्या संदर्भातील अडचणी दिसतील, अधिकार पद हातून जाण्याची संभावना आहे, संभ्रमित होवून चुकीचे निर्णय घेऊ नका.
वृश्चिक - उत्तम धनलाभ होईल, व्यवसाय कार्ये तथा कुटुंबासाठी वेळ कसा द्यावा ह्या विषयात उत्तम प्रगत व्हाल, अपेक्षित अर्थात हवा तिथेच खर्च कराल, घरात आनंदी वातवरण असेल.
धनु - आरोग्य तर सांभाळावे तसेच वाहने देखील सावकाश चालवावीत अन्यथा अपघाताची शक्यता दिसते, नवनवीन कार्ये करण्याची इच्छा होईल.
मकर - प्रेमप्रकरणात यश दिसत असले तरी घरातील लोकांची सहमती घेऊन पुढे निर्णय घ्या, घरातील लोकांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते, विचारपूर्वक कार्ये करा.
कुंभ - जसे काम तसे फळ मिळेल, नियमित आपली कार्ये केल्याने उत्तम प्रकारे यशप्राप्ती होईल, संतति सुख मिळेल, कलाकौशल्यात छान प्रगती होईल.
मीन - आरोग्याची प्रतिकारशक्ती कमी होईल, कोणत्याही कार्याप्रती महत्वाकांक्षा कमी होऊ देऊ नका, तुम्ही सर्व प्रकारे तयार आहात केवळ आत्मविश्वासाची आवश्यकता आहे,ध्यान-धारणा वाढवा व स्वतःवर विश्वास ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.