ज्योतिषाचार्य : सारंग चिक्षे
गुरुवार,१७ आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष,
शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.
तिथि- पौर्णिमा १६l५५
रास- मीन
नक्षत्र- रेवती १६l१९
योग - हर्षण २४l४०
करण - भद्रा ०६l४७
दिनविशेष - चांगला दिवस
मेष - कोणतेही काम जलदरित्या होईल, मनासारखी कार्ये होतील, आरोग्य प्रतिकार शक्ति उत्तम, मन प्रसन्न वाटेल, नविन निर्णय घ्याल, विशेष ऊर्जा मिळेल. प्रवास देखील छान होईल.
वृषभ - धनलाभ होईल,आपल्या बोलण्यानुसार प्रगती निश्चित होईल, गोड वाणी तर उत्तम लाभ, आपल्या शब्दांनी अनेकांची मने जिंकाल, कुटुंबाकडून सुख प्राप्ती होईल त्याचबरोबर आनंद साजरा कराल.
मिथून - भावंडांशी संपर्क होईल,चांगल्या बातम्या मिळतील,काहितरी नवीन पराक्रम करण्याची इच्छा होऊ शकते,आज शेजारी लोकांशी संवाद साधाल,द्विधा मनस्थितीतून मार्ग मिळेल.
कर्क - घरासंबंधतील कार्ये जलद गतीने होताना दिसतील,घरामधे आनंदाचे वातावरण दिसेल, कामामध्ये चांगला फायदा होईल.
सिंह - आजचा अभ्यास नियमित पूर्ण होईल,कमी कष्टात कार्ये संपन्न होतील.मार्केट क्षेत्रात यशलाभ ,संतती सुख मिळेल,प्रेमात यश मिळेल.
कन्या - शत्रूंपासून सावधान राहावे कदाचित फसवणुक होऊ शकते, सावधरित्या प्रवास करावा,लक्षपुर्वक कार्ये करावीत कोणीतरी बाधा आणण्याचा प्रयत्न करेल असे दिसते,अध्यात्मात प्रगती करण्याचा प्रयत्न करावा.
तूळ - आपल्या राशीत रवीने प्रवेश केला आहे जिथे रवी निर्बली असतो,इथे रवीच्या भावानुसार फले मिळतील, शक्यतो नोकरीमध्ये किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक - वरिष्ठांकडून किंवा पत्नीकडून धनलाभ होऊ शकतो, वाहने सावकाश चालवावीत अपघाताची लक्षणे दिसतात,एकांत प्रिय वाटेल, प्रवास देखील एकटेच कराल, आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल.
धनु - प्रवासासाठी उत्तम दिवस, प्रवासी कामे व्यवस्थित पार पडतील,यात्रा इत्यादी सुखरूप होतील,अध्यात्मातील प्रगती वाढेल, उच्च शिक्षणासाठी केलेले श्रम फलदायी ठरेल.
मकर - कष्टमय कार्ये येतील परंतु यशस्वीपणे पूर्ण देखील होतील, व्यवसायात उत्तम लाभ होईल,संशय सोडावा व जलद गतीने पुढे जावे कोणीही फसवणार नाही त्यामुळे मागे न पाहता कार्ये सफल करून दाखवावी.
कुंभ - थोडा विलंबाने लाभ होईल,केलेल्या कामाचे फल अपेक्षित वाटेल परंतु असे नसून ते धैर्याने उत्तम प्रकारे मिळणार आहे,चिंता नसावी तुमच्या वाट्याचे तुम्हाला निश्चित मिळणार.
मीन - बारावा चंद्र अधिक खर्च दर्शवितो तो पण अनपेक्षित खर्च. त्यामुळे खरेदीवर नियंत्रण ठेवा.वेळेवर लक्षात येणार नाही परंतु मग वाटू शकते की आवश्यकता नसताना देखील अधिक खर्च होतोय.दूरचा प्रवास टाळावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.