Yuri Alemao On Mhadei: 'म्हादई, बेरोजगारी, वाढत्या अपघातावरुन युरी आलेमाव यांची सरकारवर टीका; म्हणाले राज्यपालांनी तरी...

म्हादई पाणी समस्या निराकरणासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आवश्यकता
Yuri Alemao | Goa News
Yuri Alemao | Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्हादई नदीचे कर्नाटक - गोवा राज्यातील पाणी वाटप, अन्नधान्याची नासाडी, बेरोजगारी, वाढते अपघात या मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभुमीवर आज गोवा विधानसभा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर आसूड ओढत राज्यपालांना हे मुद्दे सोडवण्यासाठी विनंती केली आहे.

(Yuri Alemao requests Governor to form all party delegation to resolve Mhadei issue)

Yuri Alemao | Goa News
Goa University: दर्जेदार शिक्षणासाठी गोवा विद्यापीठाचं मोठं पाऊल, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी केला करार

मिळालेल्या माहितीनुसार आज विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी गोवा राज्यपाल राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना म्हादई पाणी समस्या निराकरणासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याची विनंती केली आहे.

सध्या म्हादईवर कर्नाटक राज्याने पेयजलसाठी एक प्रकल्प सुरु केला आहे. पर्यवारण तज्ज्ञांनी ही याबाबत बोलताना कर्नाटकच्या या हालचालींवर वेळीच लक्ष न दिल्यास गोव्यातील काही भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो असे म्हटले होते. नेमके याच मुद्यावरुन आलेमाव यांनी राज्यपालांना विनंती केली आहे.

Yuri Alemao | Goa News
Viral Video : ओव्हरटेक केल्याचा राग; वृद्ध व्यक्तीने भररस्त्यात हातोड्याने कारच फोडली

पुढे बोलताना आलेमाव यांनी गोवा राज्यातील वाढत्या अपघाताच्या प्रकरणावर भाष्य केले ते म्हणाले की, गोव्यात आता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दिवशी गोमंतकीयांचा बळी जात आहेत. यावर तातडीने शाश्वत उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यावेळी आलेमाव यांनी अन्नधान्याची नासाडी, चोरी प्रकरणे, बेरोजगारी या समस्यांचा उल्लेख करत सरकारच्या कारभारावर सवाल खडा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com