Goa Assembly Monsoon Session 2024: बाकीबाबच्या कवितेची प्रत्येक ओळ उद्‍ध्वस्त; अर्थसंकल्पावरून युरी कडाडले

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: इव्हेंट आयोजनासाठी पैसा आहे पण गोमंतकीयांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप युरी यांनी केला
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024:  इव्हेंट आयोजनासाठी पैसा आहे पण गोमंतकीयांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप युरी यांनी केला
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : अर्थसंकल्पातून नव्या उद्योजकांना अजिबात नैसर्गिक स्थिरता मिळणार नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पोलिस, आरोग्य आणि मच्छीमार खात्याच्या भांडवली खर्चाच्या आकडेवारीवर बोट ठेवले.

पोलिस खात्यासाठी २६.१० कोटी, आरोग्य खात्‍यासाठी ३५३ कोटी तर मच्‍छीमार खात्‍यासाठी ५३.६६ कोटी, परंतु यावर्षी भांडवली खर्च पोलिस ३९४ टक्के, आरोग्य ३६५ टक्के तर मच्छिमार खात्यासाठी ७३.०६ टक्के खर्च दाखविला आहे, असेही ते म्हणाले.

सभागृहात बुधवारी २०२४-२५ अर्थसंकल्पावर चर्चासत्रात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव बोलत होते. सरकारकडे इव्हेंट आयोजनावर खर्च करण्यासाठी पैसा आहे पण गरजू गोमंतकीयांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप युरी यांनी केला. ते पुढे म्हणाले, सौरऊर्जा फेरीबोटीसाठी ३.९७ कोटी खर्च केले. २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर यांचा ओएसडी असलेले प्रसन्न कार्तिक यांच्या नोटमुळे ही बोट ऑर्डर केली.

परंतु त्यावेळी बंदर कप्तानने ही बोट गोव्यासाठी योग्य नाही, असे म्हटले. त्यामुळे सरकारच्या कोणत्या जावयासाठी ही बोट मंजूर केली? असा सवाल त्यांनी केला. कदंब परिवहन महामंडळाचे ६० मार्ग बंद आहेत. दिव्यांगांसाठी ईव्ही बससेवा अद्याप उपयोगाची नाही. पेडणे ते काणकोणपर्यंत पाण्याचे प्रश्न आहेत, पण त्याचे सरकारला काही पडलेले नाही.

बाकीबाबच्या कवितेची प्रत्येक ओळ उद्‍ध्वस्त!

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात कवी बाकीबाब बोरकर यांच्या कवितेने केली. आज बाकीबाब असते तर या सरकारचे कठोर टीकाकार असते. बाकीबाब बोरकरांच्या स्वप्नातील गोवा या सरकारने उद्ध्वस्त केला आहे. बाकीबाबांच्या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ कवितेची प्रत्येक ओळ सरकारने उद्ध्वस्त केल्याचेही त्यांनी नमूद केले. म्हादईच्या विषयावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे भाष्य केले आहे, त्यातून सरकारने तडजोड केल्याचे दिसते, असे युरी म्हणाले. खाणी केव्हा सुरू होतील हे माहीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यासाठीही इव्हेंट करावा, असा टोमणा त्यांनी लगावला.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024:  इव्हेंट आयोजनासाठी पैसा आहे पण गोमंतकीयांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप युरी यांनी केला
Goa Assembly Monsoon Session 2024: डिचोली बगलमार्गावर वाहतूक पोलिस तैनात करणार; मुख्यमंत्री सावंत यांचे आश्‍‍वासन

‘डबल इंजिन’ सरकारमुळे राज्‍याचा विकास : मुख्‍यमंत्री सावंत

‘डबल इंजिन’ सरकार असल्याने आम्ही पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास साधू शकलो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महसुलाची मागील तीन वर्षांची आकडेवारी सादर केली. दरवर्षी महसूल वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु सविस्तर माहिती हवी असेल तर तीही विरोधकांना दिली जाईल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची रक्कम आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे पैसे राज्याच्या तिजोरीत येत नाहीत. यावर्षी विविध योजनांसाठी केद्र सरकारकडून मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com