Bicholim: कामावरून काढलेल्या सेसाच्या कामगारांची पिळगाव पंचायतीवर धडक

आमचा प्रश्न सुटेपर्यंत कंपनीला कोणताही 'ना हरकत दाखला' देवू नये अशी या कामगारांची प्रमुख मागणी आहे
Pilgoan Bicholim
Pilgoan Bicholim
Published on
Updated on

Bicholim: भवितव्याचा प्रश्न सुटावा, म्हणून कामावरून काढलेल्या 'सेसा'च्या कामगारांचा संघर्ष चालूच आहे. भवितव्याच्या चिंतेने अस्वस्थ बनलेल्या या कामगारांनी आज पिळगाव पंचायतीवर धडक देत, आपली मागणी पंचायतीसमोर मांडली.

आमचा प्रश्न सुटेपर्यंत कंपनीला कोणताही 'ना हरकत दाखला' देवू नये अशी या कामगारांची प्रमुख मागणी आहे

सेसा कामगार संघटनेच्या बॅनरखाली पिळगाव पंचायतीवर धडक दिलेल्यांमध्ये पिळगावमधील स्थानिक कामगारांसह शंभरहून अधिक कामगारांचा समावेश होता.

पंचायतीने कामगारांचे म्हणणे ऐकून घेताना कामगारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. थोडा अवधी द्या, कंपनीच्या व्यवस्थापनाशी बोलणी करून कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पंचायतीच्या वतीने या कामगारांना देण्यात आले.

कामगार स्वस्थ बसणार नाहीत

पंचायतीच्या विनंतीला मान देऊन आम्ही वीस दिवसांपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत तोडगा निघाला नाही, तर कामगार स्वस्थ बसणार नाहीत, असे कामगारांच्यावतीने अनिल सालेलकर यांनी स्पष्ट केले.

पंचायत कामगारांच्या पाठीशी

पंचायत कामगारांच्या पाठीशी उभी आहे, असे सरपंच सौ. मोहिनी जल्मी यांनी स्पष्ट केले. यावेळी उपसरपंच सुनील वायंगणकर, उमाकांत परब गावकर, स्वप्नील फडते, शर्मिला वालावलकर आणि सोनिया बेतकीकर हे पंच सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com