दैनंदिन व्यवहारात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.म्हणून यापुढे तरी महिलांनी आरोग्याची काळजी प्राधान्याने घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,की महिला आपल्या आरोग्यांकडे दुर्लक्ष करतात. केंद्र सरकारने सुरू केलेली फिट इंडिया योजना कुटुंबाचे आरोग्य सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याबरोबरच जेनेरिक औषधे आणि एक रुपयांत मिळणारे सॅनिटरी पॅड या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना महिलांना सन्मानाने जगण्यास प्रेरणा देणाऱ्या आहेत.
आज पणजीत महिला मोर्चाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महिला मोर्चा प्रभारी सुलक्षणा सावंत, आमदार दिलायला लोबो, आरती बांदोडकर, रंजना पै, गीता कदम, परिमल सावंत उपस्थित होते.
गौरव नारीशक्तीचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यात पत्रकार सपना सामंत, डॉ. अक्षया पावसकर, श्वेता चारी, रत्नमाला परब, हेमाश्री गडेकर, डॉ. मीना पाणंदीकर, डॉ. पूनम संभाजी, सावनी शेट्ये मळीक, शकुंतला भरणे, सरस्वती वेळीप, धनुष्या दि गामा, गुंजन नार्वेकर, रिद्धी सिद्धी म्हापसेकर आणि श्री गर्जना ढोल पथकामधील महिलांचा समावेश होता.
केंद्र आणि राज्य सरकारने महिला सशक्तीकरणासाठी राबवलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम महिला मोर्चाच्या भगिनींचे आहे. केंद्र सरकारच्या एकात्म टॉयलेट योजना, बेटी बचाव बेटी पढाव योजना,प्रसुती रजेत वाढ यासारख्या योजना तसेच रद्द केलेला तीन तलाक मुळे महिलांना आता सन्मानाने जगता येत आहे.
- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.