Margao: रवींद्र भवनचे अध्यक्षपद कुणाला मिळणार?

मडगावचे रवींद्र भवन गेले सात ते आठ महिने अध्यक्ष व उपाध्यक्ष नसताना कार्यरत आहे.
Ravindra Bhavan
Ravindra BhavanDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete: मडगावचे रवींद्र भवन गेले सात ते आठ महिने अध्यक्ष व उपाध्यक्ष नसताना कार्यरत आहे. निवडणूक होऊन पाच महिने झाले तरी सरकारने ही दोन्ही पदे अजून भरलेली नाहीत. त्यामुळे रवींद्र भवनाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

सध्या भवनच्‍या वातानुकूलित व्यवस्थेत बिघाड झाला असून त्याची दुरुस्ती अजून सुरू झालेली नाही. या संदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना विचारले असता त्यांनी सांगितले की, रवींद्र भवनच्या अध्यक्षपदी लवकरच नियुक्ती केली जाईल. मात्र, त्यांनी या पदावर कोणाची वर्णी लागेल हे सांगण्याचे टाळले.

Ravindra Bhavan
Hyderabad Police: Drugs प्रकरणी हैदराबाद पोलिस पथक लवकरच गोव्यात

रवींद्र भवनची दुरुस्ती किंवा दैनंदिन कामातील अडचणींची आपल्याला जाणीव असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी विधानसभा निवडणुकीमुळे जानेवारी महिन्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भवनमध्ये होणारे अनेक कार्यक्रम बंद आहेत. अनेक किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत, कॅंटीन बंद आहे.

Ravindra Bhavan
Adarsh Gram Yojana: आदर्श ग्राम योजनेंतर्गत वेळ्ळी गावाचा विकास होणार!

दामू नाईक यांचीही वर्णी शक्‍य: आपल्याला रवींद्र भवनाचे अध्यक्षपद घेण्याचा प्रस्ताव दिला होता; पण मी ते पद स्वीकारणार नाही, असे माजी आमदार दामू नाईक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. कदाचित एक तर त्यांचीच वर्णी लागू शकते किंवा गेल्या दोन दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडी व उलथापालथींमुळे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या पसंतीची व्यक्ती अध्यक्षपदावर विराजमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ravindra Bhavan
FIFA World Cup: सर्व फुटबॉल मैदाने 20 सप्टेंबर पर्यंत फिफाच्या हवाली करणार - क्रिडामंत्री

सत्ताबदलामुळे काहीही होऊ शकते. शिवाय दिगंबर कामत यांना मडगावच्या कार्यकर्त्यांना विश्र्वासात न घेता भाजपमध्ये प्रवेश दिला आहे, असे काही प्रमुख कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे अशा नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमधून त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्यापैकी एकाची अध्यक्षपदी नियुक्ती होण्याचीही शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com