गेल्या काही दिवसांपासून गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याची एक धक्कादायक आकडेवारी सोशल मिडियावर शेअर केली जातेय. याबद्दल बोलताना रामानुज मूखर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत 2014 ते 2023 या काळात गोव्याला भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा दावा केला.
मात्र रामानुज मूखर्जीनी चुकीचे आकडे शेअर केल्याचा आरोप गोवा पर्यटन खात्याकडून दाखल करण्यात आलाय. राज्यातील पर्यटन व्यवसायावर रामानुजन यांच्या ट्विटमुळे वाईट परिणाम झाल्याचा दावा पर्यटन विभागाने तक्रारीत केला आहे. पर्यटनावरील ट्विटनंतर गोव्यात तसेच बाकी ठिकाणी रामानुज मूखर्जी हे नाव बरंच गाजतंय आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे असा प्रश्न देखील विचारल जातोय.
रामानुज मुखर्जी हे एक बंगाली युवा उद्योजक असून त्यांचा जन्म 1987 मध्ये झाला होता. रामानुज यांनी 2011 मध्ये नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरीडिकल सायन्सेसमधून बीएस्सी एलएलबी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.
रामानुज मुखर्जी हे गेल्या दोन वर्षांपासून गुरुग्राम, हरियाणा येथील एका ट्रेनिंग संस्थेचे प्रमुख आहेत. याशिवाय, गेल्या सात वर्षांपासून 'लॉ सिखो' या कायदेविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे प्रमुखपद सांभाळतायेत. रामानुज यांना 2004 मध्ये क्रिएटिव्ह रायटिंगसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.
रामानुज यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिल्यास, ते अनेकेवळ भारतीय राजकारण, कायदा, विविध क्षेत्रांमधील करियर किंवा गुंतवणुकीच्या विषयांवर माहिती शेअर करताना दिसतात. तसेच सोशल मीडिया रिल्समधून जॉब हायरिंग, पर्सनल फायनान्स किंवा स्टार्टअप्स विषयी नेटकऱ्यांशी संपर्क करतात. रामानुज हे बऱ्यापैकी कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित आहेत.
“गोवा सरकारने माझ्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. गोव्यातील पर्यटन स्कॅम विरोधात उपाययोजना करण्याऐवजी सरकार माझ्याविरोधात तक्रार दाखल करतंय ही एक दुर्दैवी बाब आहे. पर्यटकांच्या तक्रारीबाबत भाष्य न करता मी केवळ उपलब्ध असणारी सार्वजनिक माहिती शेअर केली होती".
"निराधार पोलिस तक्रार दाखल करुन प्रशासन मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मी शेअर केलेली आकडेवारी चुकीची असल्यास सरकारने योग्य आकडेवारी द्यायला हवी होती पण, तसे न करता कायद्याचा दुरोपयोग करुन टीकाकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी याविरोधात कायदेशीर लढा देईन. ”
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.