Goa: ऐन गणेशोत्सवात सत्तरी पाण्याविनाच !

Salcete: चतुर्थी उत्सवादरम्यान सत्तरी तालुक्यातील बहुतांश गावात गेल्या तीन दिवसांपासून नळाला पाणी नाही
Water Shortage
Water ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete: चतुर्थी उत्सवादरम्यान सत्तरी तालुक्यातील बहुतांश गावात गेल्या तीन दिवसांपासून नळाला पाणी नाही त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र पाणी पुरवठा कमी पडल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

घाटमाथ्यावर पाऊस लागल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्पाला होणारा पाणीपुरवठा गढूळ स्वरूपात असल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्पाच्या यंत्रणेवर पाणी शुद्धीकरण करताना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा शुद्ध होत नसून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना अडचणी निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Water Shortage
Goa Sand Extraction : गोव्यात वाळू माफियांचा वर्चस्ववाद टोकाला

गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित (Electricity Outage) होत असल्यामुळे पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र आज दिवसभर अशाच प्रकारची परिस्थिती पहावयास मिळाली. दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. प्रकल्पावर पाणी शुद्ध करताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत होत्या. गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा शुद्ध करण्यासाठी यंत्रणेवर ताण निर्माण होत असून अपेक्षित प्रमाणात पाणी शुध्द होत नसल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये पाणीपुरवठा करताना निर्बंध येत आहेत, असे अधिकारी सांगतात.

Water Shortage
Goa Corona Update: गोव्यात आज 76 नवे कोरोनाबाधित, 127 जणांना डिस्चार्ज

पाणीपुरवठा कार्यालयात तक्रार: तीन दिवसापूर्वी स्थानिक राजेश सावंत यांनी वाळपई सार्वजनिक पाणीपुरवठा कार्यालयात पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रार केली होती. सावंत म्हणाले, की गावातील पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी विशेष सहकार्य केले. येणाऱ्या काळात गावात मुबलक स्वरूपाचा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी आपण स्थानिक आमदारांची भेट घेणार आहोत, असे सयाजी सावंत यांनी सांगितले.

Water Shortage
Goa: मोपा विमानतळ परिसरात पुन्हा सापडले 'भुयार'

* पर्डे भागात तीव्र पाणी टंचाई-

1. कोपर्डे भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा पाणीपुरवठा कमी पडल्यामुळे अनेक नागरिकांना विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागले.

2. त्यानंतर स्थानिक पंच सभासद सयाजी सावंत व राधिका सावंत यांनी विशेष लक्ष देऊन सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.

3. शेवटी पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गावांमध्ये येऊन पाहणी केली. काही ठिकाणी पाणी नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेमध्ये दुरुस्ती केल्यानंतर संध्याकाळी उशिरा अनेक घरांना पाणी पुरवठा करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com