PM मोदींमुळे मिळाली प्रेरणा, कॅन्सरशी लढा देणाऱ्या विश्वजीत राणेंच्या मातोश्रींनी ध्वजारोहणाला लावली हजेरी

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मातोश्री विजयादेवी राणे कॅन्सरशी लढा देत आहेत.
Vishwajit Rane's mother Vijaya devi Rane fighting with cancer hoisted flag at Bhumika School
Vishwajit Rane's mother Vijaya devi Rane fighting with cancer hoisted flag at Bhumika School Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात सर्वत्र 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केल्यानंतर देशाला संबोधित केले. मागील वर्षापासून देशात हर घर तिरंगा मोहिम सुरू आहे. सरकारच्या वतीने नागरिकांना घरोघरी तिरंगा फडवण्याचे आवाहन करण्यात येते.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मातोश्री विजयादेवी राणे कॅन्सरशी लढा देत आहेत. तब्येत ठिक नसताना देखील त्यांनी सकाळी एका शाळेतील ध्वजारोहणाला हजेरी लावली.

मंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

"माझी आई विजयादेवी राणे कॅन्सरशी लढा देत आहे. तिला सकाळी भूमिका शाळेत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर पे तिरंगा अशी दिलेली साद त्यातून भूमिका शाळेत ध्वज फडकवण्याची प्रेरणा मिळाली. मला आज तिचा खूप अभिमान वाटतोय." असे ट्विट मंत्री राणे यांनी केले आहे.

Vishwajit Rane's mother Vijaya devi Rane fighting with cancer hoisted flag at Bhumika School
अपयशाने खचतील ते गडकरी कसले, गोव्यात स्कायबसची चाचणी अयशस्वी ठरल्यानंतर आता पुण्याला संधी

मागील अनेक दिवसांपासून मंत्री विश्वजीत राणे यांच्या मातोश्री कॅन्सरची लढा देत आहे. विश्वजीत राणे यांची आईच्या उपचारासाठी चाललेली धडपड देखील वारंवार दिसली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आईने आजारपणाला बाजुला ठेवत ध्वजारोहणाला हजेरी लावली याचा विशेष आनंद राणे यांना झाला असून, त्यांनी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com