‘गरज पडल्यास दिल्लीला जाणार’ : विश्वजीत राणे

दाबोळी विमानतळाच्या परिसरात बांधकामासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकाबद्दल विधानसभा अधिवेशनानंतर चर्चा करून तोडगा काढणार असल्याचं विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दाबोळी विमानतळाच्या परिसरात बांधकामासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकाबद्दल विधानसभा अधिवेशनानंतर गोवा क्षेत्राचे फ्लॅग कमांडिंग अधिकारी (फोगा) सोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळे घेऊन दिल्लीला जाऊन केंद्रापुढे हा विषय मांडू, असे आश्‍वासन नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी विधानसभेत दिले. वास्कोचे आमदार कृष्णाजी ऊर्फ दाजी साळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

‘आयएनएस हंसा’कडून कलर कोडींग करून तीन महिन्यांची मुदत दिली होती. परंतु, याचे निवारण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यासाठी अगोदर फोगाशी बोलणी करणार आहे, असे विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.

18 मे 2018 मध्ये संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले होते की, विमानतळाच्या 500 मीटर परिसरात काही निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज, बचत केलेल्या पैशातून जमीन खरेदी केलेल्यांना फटका बसला आहे. मुळात हे परिपत्रक कायद्याच्या अखत्यारित बसते की नाही हे तपासण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे, असे साळकर म्हणाले.

Vishwajit Rane
फसलेल्या बंडात काँग्रेस नेस्तनाबूत होण्याची बिजे

...तर विजेचा ताण पडेल

दाबोळी येथे सामान्य माणसांचे कारण देऊन बरेच काही घडत आहे. सामान्य माणसाच्या नावाआड 1200 मोठी रहिवासी संकुल येथे बांधण्यात येत आहेत. येथे सुमारे 18 हजार बिगर गोमंतकीय राहणार आहेत. कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट खरेदी करणारे हे सामान्य नाही. तसेच, हे चार टक्के वीज वापरणार असल्याने ताण वाढणार आहे, अशी चिंता फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com