Sanguem Court: बस अडवून मारहाणप्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता

Goa Crime: आरोपपत्रानुसार मारहाण करून जखमी करण्याची ही घटना सुर्ला-साकोर्डा येथे ९ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती
Goa Crime: आरोपपत्रानुसार मारहाण करून जखमी करण्याची ही घटना सुर्ला-साकोर्डा येथे ९ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती
court Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मारहाण करून जखमी केल्याचा आरोप असलेल्या साकोर्डा-धारबांदोडा येथील विनोद देसाई याला सांगे न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.

न्यायालयात करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार मारहाण करून जखमी करण्याची ही घटना सुर्ला-साकोर्डा येथे ९ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. या प्रकरणातील संशयिताने जीए-०९-यू-९९६५ क्रमांकाची प्रवासी बस अडवली.

बसचालक बाबू पावणे यांना बसमधून बाहेर काढून मारहाण केली तसेच बस क्लिनर विठ्ठल सावंत यांना ढकलल्यामुळे ते जमिनीवर पडून जखमी झाले. याप्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३४१, ३२३ व ४२७ कलमांखाली गुन्हा नोंद केला होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

Goa Crime: आरोपपत्रानुसार मारहाण करून जखमी करण्याची ही घटना सुर्ला-साकोर्डा येथे ९ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती
Mhadei River Dispute: ‘कदंब’ अडवून कन्नड संघटनांची घोषणाबाजी!

याप्रकरणी पोलिसांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा नोंद करून २३ नोव्हेंबर २०२० रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. न्यायालयात पुराव्यासंबंधीचे कामकाज ५ जुलै २०२२ रोजी सुरू झाले आणि ३० जुलै २०२२ रोजी सांगे न्यायालयाने निवाडा दिला.

संशयिताविरुद्धचा हा खटला न्यायालयात सिद्ध करण्यास सरकार पक्षाला अपयश आल्यामुळे संशयिताविरुद्ध असलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्या. अनुषा कायसूवकर यांच्या न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com