Cash For Job Scam: सेवेत मुदतवाढ दिलेल्यांकरवीच नोकरी घोटाळा, सखोल चौकशीअंती अनेक ‘पूजा’ सापडतील; सरदेसाईंचा घणाघात

Vijai Sardesai: सरकारी नोकरीसाठी पैसे या घोटाळ्यांशी हल्‍लीच सरकारी सेवेत वाढ दिलेल्‍या काही अधिकाऱ्यांचा थेट संबंध असल्‍याचा आरोप गोवा फाॅरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सरकारी नोकरीसाठी पैसे या घोटाळ्यांशी हल्‍लीच सरकारी सेवेत वाढ दिलेल्‍या काही अधिकाऱ्यांचा थेट संबंध असल्‍याचा आरोप गोवा फाॅरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. या घाेटाळ्यांची सखोल चौकशी केल्‍यास अनेक पूजा नाईक समाेर येतील. काही अधिकाऱ्यांना सेवावाढ देऊन त्‍यांच्‍याकडून हा घाेटाळा करवून घेतला आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

दरम्‍यान, या घोटाळ्‍याची व्‍याप्‍ती बरीच मोठी असल्‍याने आणि त्‍यात कित्‍येकजण गुंतल्‍याची शक्‍यता असल्‍याने उच्‍च न्‍यायालयाच्या निवृत्त न्‍यायाधीशांचा आयोग स्‍थापून या घाेटाळ्‍याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली असून हा घाेटाळा ‘व्‍यापम’ घोटाळ्‍याच्‍या तोडीचा असल्‍याचा आरोप त्‍यांनी ट्‍वीटद्वारे केला आहे.

Vijai Sardesai
Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल, न्यायालयीन चौकशीच्या मागणीने सावंत सरकारवर दबाव

फातोर्डा येथे एका विकासकामाच्‍या पहाणीसाठी आले असता सरदेसाई यांना या घोटाळ्‍यांबद्दल विचारले असता, या घाेटाळ्यात कित्‍येकांचा समावेश आहे. दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नाेकरीभरती हा त्‍याचाच एक भाग आहे. गोव्‍यात फक्‍त सरकारी नाेकऱ्याच विकल्‍या जात आहेत, असे नव्‍हे तर या सरकारने संपूर्ण गाेवाच विक्रीसाठी काढला आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

image-fallback
Cash For Job Scam: प्रिया यादवने महिलांनाही घातली 'टोपी'; फसव्या शब्दांना बळी पडल्याची बायकांची व्यथा

संशयितांचे कॉल डिटेल्‍स जाहीर करा!

नाेकरी घाेटाळ्यांत फक्‍त आता अटक केलेल्‍या संशयितांचाच सहभाग आहे हे मान्‍य करण्‍यास आम्‍ही तयार नाहीत. राजकीय आशीर्वाद असल्‍याशिवाय असे घोटाळे होऊ शकत नाहीत, असा आरोप आम आदमी पक्षाचे पदाधिकारी फ्रान्‍सिस कुएल्हो यांनी केला असून हे घाेटाळे कुणाच्‍या आशीर्वादाने झाले आहेत, हे कळण्‍यासाठी संशयितांच्‍या फोनचे कॉल डिटेल्‍स काढून ते जनतेसाठी जाहीर करावेत, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. नोकरी घाेटाळ्यांतील हे संशयित कुणाच्‍या संपर्कात होते हे त्‍यातून स्‍पष्‍ट होईल, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com