Delilah Lobo: बिल्डर लॉबीने ‘फिल्मसिटी’ला जमीन द्यावी : दिलायला लोबो

अनेक बिल्डरांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत : दिलायला लोबो
Delilah Lobo
Delilah LoboDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) ‘फिल्मसिटी’ उभारण्याचे निश्‍चित केले आहे, त्यासाठी जागेची मागणी केली आहे. राज्यात जमीन विक्री व्यवहारात बिल्डर लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

अनेक बिल्डरांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, त्यामुळे त्या जमिनी बिल्डरांनी खरेतर राज्याला ‘फिल्मसिटी’साठी द्याव्यात, असे मत ईएसजीच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांनी व्यक्त केले आहे.

Delilah Lobo
Goa Mining: साठवलेल्या खनिजाचा ई-लिलाव बेकायदेशीर; गोवा फाउंडेशनचा आक्षेप

ईएसजीला ‘फिल्मसिटी’साठी जमीन पाहिजे, त्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. किमान अडीचशे एकर जागा ‘फिल्मसिटी’साठी हवी आहे. त्यात खासगी मालकांकडे अशी जमीन असल्यास आणि ते विक्री करू इच्छित असल्यास ते संस्थेशी संपर्क साधू शकतात.

सध्या ईएसजीने ‘फिल्मसिटी’साठी जाहिरात काढताच लोलये-पोळे येथील कोमुनिदाद संस्था जमीन देण्यासाठी पुढे आली आहे.

गोव्यात ‘फिल्मसिटी’ झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतात. जागा देण्यास इच्छुक असलेले पुढे आल्यास किंवा मिळाल्यास सरकार त्या जागेच्या विक्रीव्यवहाराविषयी मंजुरी घेऊन त्याची रक्कम मंजूर केली जाईल.

ईएसजीचे चेअरमन मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच या प्रकल्पाला पुढे नेण्याचे ठरविले आहे. बिल्डरकडे जर एवढी मोठी जागा असेल, तर त्यांनी राज्याचा विचार करून द्यावी, असे लोबो यांनी नमूद केलेे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com