Vegetable Rates : ‘फलोत्पादन’वर कांदा, टोमॅटो 35 रुपये किलो; बाजारातील दरांमध्ये तफावत

Vegetable Rates : भाज्यांच्या किमती वाढल्या; आले-लसूणचा भडका
Vegetable Rates  tomato
Vegetable Rates tomatoDainik Gomantak
Published on
Updated on

Vegetable Rates : पणजी, मागील महिन्याभरापासून भाजीपाल्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर कांदा आणि टोमॅटोचा ३५ रुपये प्रतिकिलो आहे.

शंभरी पार केलेले कांदा, टोमॅटो आता कुठे ३५ रुपयांवर आल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. परंतु बाजारात अजूनही कांदा ५० व टोमॅटो ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.

आले, लसूणचे दर वाढले असून लसूण ४०० रुपये किलो दराने तर आले १५० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. आपल्या दैनंदिन आहारातील जीवनावश्‍यक घटक असणाऱ्या भाज्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना भाजीपाला घेणे परवडत नसून मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडत आहे.

ग्रामीण भाज्यांना मागणी

राज्यातील अनेक नागरिकांचा ग्रामीण भागातून शेतकऱ्यांद्वारे येणारा भाजीपाला खरेदीकडे अधिक कल असतो.

भाजीपाल्यासहित काही शेतकरी या दिवसांत अळूमाडी, भाजीची केळी, तिरफळे, गावठी पपई, कणगी, आदी विक्रीसाठी आणतात. त्यांनादेखील चांगला दर भेटत आहे.

Vegetable Rates  tomato
Goa Traffic Police - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11,326 जणांवर गुन्हा नोंद | Gomantak TV

बाजारातील भाजीचे दर

कोबी ३०

गाजर ५०

फ्लॉवर ४०

मिरची ७०

बटाटा ४०

कांदा ५०

टोमॅटो ४०

लसूण ३५० ते ४००

आले १५०- १८०

फलोत्पादनाचे दर

कोबी २१

गाजर ३८

फ्लॉवर २९

हिरवी मिरची ५०

कांदा ३५

बटाटा २८

टोमॅटो ३५

लसूण ३६३

आले १५०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com