Vegetable Prize Hike : गृहिणींचे बजेट कोलमडले, स्थानिक भाज्यांची मागणी वाढली

Vegetable Prize Hike : : लसूण 300 वर तर कांदा, टोमॅटो @ 60
Vegetable Prize Hike
Vegetable Prize HikeDainik Gomantak
Published on
Updated on

Vegetable Prize Hike : पणजी, मागील महिन्याभरापासून भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले असून, स्थानिक भाज्यांना मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कांदा, टोमॅटो, पालेभाज्या, लसूण तसेच आल्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मागील महिनाभरापासून लसणाचे दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज पणजी गुणवत्ता, लसुणाचा आकार याप्रमाणे बाजारात ३२० ते ३५० रू प्रती किलो दराने विक्री केली जात होती. आले देखील १५० ते १७० रूपये प्रती किलो दराने विकले जात आहे.

कांदा तसेच टॉमेटो ६० रूपये किलो दराने विकला जातोय. मोठ्या प्रमाणात झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना भाजीपाला घेणे परवडत नसून मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडत आहे.

Vegetable Prize Hike
Goa Politics: दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करा; ‘त्या’ आठ आमदारांना सुप्रिम कोर्टाचा आदेश

राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला बाजारात विक्रीला येत असल्याने अनेक नागरिक ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांद्वारे भाजीपाला घेण्याकडे अधिक कल असतो. भाजीपाल्या सहित काही शेतकरी या दिवसात अळूमाडी, भाजीची केळी, तिरफळे, गावठी पपई विक्रीसाठी आणतात त्यांना देखील चांगला दर भेटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com