Vegetable Rates: मुसळधार पावसाचा फटका; गोव्यात भाज्यांचे दर वाढले

Vegetable Price Hike in Goa: जोरदार पाऊस पडत असल्याने भाज्या कुजल्या असून भाज्यांच्या दरांमध्ये वाढ
Vegetable Price Hike in Goa: जोरदार पाऊस पडत असल्याने भाज्या कुजल्या असून भाज्यांच्या दरांमध्ये वाढ
Vegetable Price hike Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim,Goa

पणजी: गोव्यात भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली असल्याने स्थानिकांना कष्ट सोसावे लागू शकतात. गोव्यात बरीच भाजी शेजारी राज्यांमधून आणली जाते, मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात जोरदार पाऊस पडत असल्याने भाज्या कुजल्या असून भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

पणजीच्या बाजारात 50 रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विकला जातोय. कांद्याचे दर बरेच महागले असून कांदा 70 रुपये किलो प्रामणे विकला जातोय. गाजर 80 रुपये किलो, आले 160 रुपये किलो प्रमाणे भाजी विकली जात आहे, मात्र मिरचीचे दर आटोक्यात असल्याची माहिती स्थानिक भाजी विक्रेत्याने दिली.

गोव्यातील भाजीविक्रेत्यांचा अनुमानाप्रमाणे हा दर आणखीन एक-दोन महिन्यांपर्यंत असाच राहण्याची शक्यता आहे. दोन्ही शेजारी राज्यांमध्ये अतिवृष्टी होत असून भाजी वाटेतच कुजल्याने महागली आहे.

Vegetable Price Hike in Goa: जोरदार पाऊस पडत असल्याने भाज्या कुजल्या असून भाज्यांच्या दरांमध्ये वाढ
Porvorim Robbery: पर्वरीत 7000 रुपयांच्या इलेक्ट्रीक मीटरची चोरी; बेळगावमधला युवक पोलिसांच्या ताब्यात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com