New Year : नव्या वर्षांत मिळाले हक्काचे छत; झर्मेतील दोन कुटुंबे सुखावली

New Year : डॉ. राणेंनी स्वखर्चाने बांधून दिली घरे
New Year
New YearDainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

New Year : वाळपई, घर हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. सत्तरीतील दोन गरीब कुटुंबांना नववर्षाच्या तोंडावर हक्काचे छत मिळाल्याने ही कुटुंबे सुखावली आहेत. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वखर्चाने ही घरे बांधून दिली आहेत.

म्हाऊस पंचायत क्षेत्रातील झर्मे गावातील निकीता गावस आणि विमल गावस या दोन गरीब कुटुंबीयांना ही घरे बांधून दिली आहेत. या दोन्ही कुटुंबाची आर्थिक स्थिती एकदम बिकट होती.

निकीता गावस यांचे जुने मातीचे घर पावसाळ्यात कोसळले. त्यांचा नवरा नकुळ हा हार्ट पेशंट आहे, तरीही रोजंदारीचे काम करून आपली दोन मुले, पत्नी व वयस्कर बापाचे पोट भरतो. गेल्या पावसाळ्यात त्यांचे मातीचे घर खचू लागल्याने हे कुटुंब दडपणाखाली आले.

याबाबत स्थानिक पंच गुरुदास गावस यांना माहिती मिळताच त्यांनी या कुटुंबाला धीर दिला. तसेच याबाबत आमदार डॉ. दिव्या राणे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. आमदारांनी तातडीने प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला.

जुन्या घराच्या बाजूलाच नविन घराचे बांधकाम सुरु केले. एका महिन्याच्या आत घर बांधून पूर्ण केले. सर्व खर्च स्वतः राणे यांनी केला. सुमारे साडेपाच लाख रुपये बांधकामावर खर्च झाला. गावस कुटुंबीयांनी नव्या घरात प्रवेश केला आहे. पक्के घर मिळाल्याने हे कुटुंब सुखावले आहे.

राणेंचे उपकार...

याबाबत निकीता गावस यांनी सांगितले की, असे घर बांधण्याची आमची स्थित नव्हती. जुने घर कधी कोसळले याचा नेम नव्हता. पंच तसेच पंचायतीने मदत करत आमदार दिव्या राणे यांच्या मदतीने पक्के घर उभारून दिले. राणे यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. आज त्यांच्यामुळे आम्हाला राहण्यासाठी छत मिळाले आहे.

New Year
Goa State Debt: सरकारी प्रचार, रोड शोवरील फालतू खर्च थांबवा; बहुतांश मंत्र्यांची कामगिरी खराब

एकाच वेळी दोन घरे....

झर्मेत गावातील आणखीन एका वृध्द महिला विमल गावस यांनाही आमदारांनी घर बांधून दिले आहे. या घरासाठीही साडेपाच लाख रुपये खर्च केला आहे. एक मुलगी सोडल्यास विमल यांना कुणी नव्हते, परंतु मुलगी असाध्य आजाराने ग्रासली होती.

ती सतत आजारी असायची, महिन्याला तिला जवळपास १२ ते १५ हजारांचे औषध लागत होती. औषधांचा हा सर्व खर्च आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. दिव्या राणे पुरवत होत्या. या गरीब माय लेकीला राहण्यासाठी पक्के छत नव्हते. त्यामुळे आमदार दिव्या राणे यांनी पुढाकार घेत नवीन घर उभारले.

हे घर विमल यांच्या स्वाधीन केले आहे, मात्र या घरात राहायला आज तिची मुलगी तिच्या सोबत नाही. काही महिन्यापूर्वी तिचे आजारपणामुळे निधन झाले. विमल एकट्याच आता त्या घरात राहत आहे. या घरामुळे तिच्या डोक्यावर पक्के छत आले आहे, त्याबाबत त्या समाधान व्यक्त करतात. या महिलेला पक्के घर उभारून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com