Valpoi News : पूर्वजांनी राखलेल्या देवरायांचे संवर्धन काळाची गरज! डॉ. देविदास कोटकर

Valpoi News : नगरगाव शाळेच्या मुलांची माळोलीच्या ‘निरंकाराची राय’ला भेट
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, आपल्या पूर्वजांनी मेहनत घेऊन जंगलांना कोणतीही इजा होणार नाही. याची खबरदारी घेत जंगलांचे रक्षण केले आहे.

अशा या जंगलात उंच उंच अशी झाडे आहेत. जी जंगलांचे वैभव आहेत. अशा पूर्वजांनी संचित करून ठेवलेल्या देवरायांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नगरगाव-आंबेडे सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ. देविदास कोटकर यांनी केले.

गुरुवारी (ता.१३) सकाळी नगरगाव शाळेच्या इयत्ता आठवीच्या ३२ मुलांनी माळोलीच्या ‘निरंकाराची राय’ या देवराईला भेट दिली. यावेळी कोटकर यांनी मुलांना या देवराईविषयी सविस्तर माहिती दिली. जंगल, पर्यावरण, वन्य संपत्ती, प्राणी, पशु, पक्षी, उंच देवराई विषयीचे नाते प्रस्थापित करण्याचा यथोचित प्रयत्न केल्यास मुलांसाठी सामान्य माहितीचा खजाना मिळणार आहे.

Valpoi
South Goa : ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपवर बुमरँग; दक्षिणेतील पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंमुळे हे ढवळीकर, माविन यांना अमान्य

जंगलांबद्दल असलेली आत्मीयता प्रेरित करण्यासाठी शालेय मुलांसाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. या भागातील पट्टेरी वाघ, अन्य वन्यप्राणी जंगलांचा श्वास आहेत. म्हादईची देवराई ही अगदी उंच असून या भागात फिरताना निसर्गाचा आनंद मिळतो, असे कोटकर म्हणाले. मुलांनी देवराई परिसराची पाहणी केली व अनुभवातून वहीमध्ये जागेची टिप्पणी करून घेतली.

एकपेशीय वनस्पती बुरशीचे अधिस्थान...

या म्हादईच्या अधिवास संवर्धन भागात ‘यु’ आकाराची वैशिष्ट्यपूर्ण अशी वनस्पती आढळते. त्याची पाहणी मुलांनी केली. तसेच डोळ्यांना दिसणारी एकपेशीय वनस्पती बुरशी आढळते. जी पर्यावरणपूरक असून जंगली भागात प्रदूषण नसल्याचे संकेत दर्शविते. जो भाग अगदी पाणथळ आहे. अशा क्षेत्रात ही वनस्पती आढळून येते. निरंकाराची राय हा भाग पाण्याच्या स्रोताने भरलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com