Goa Tourist : दोघा पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले

Goa Tourist : कोलवा, बागा समुद्रकिनाऱ्यावरील घटना
Goa Tourist
Goa Tourist Dainik Gomantak

Goa Tourist :

पणजी, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उत्तरप्रदेश आणि कर्नाटकातील दोन पर्यटकांना समद्रात बुडण्यापासून वाचविले. पर्यटक पोलिस आणि जीवरक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांनी शनिवारी कोलवा समुद्र किनाऱ्यावरून २४ वर्षीय तरुणीला तर हुब्बळी कर्नाटकातील अन्य एका तरुणाला बागा समुद्रकिनारी बुडण्यापासून वाचविण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, टूरिस्ट पोलिस युनिटचे कर्मचारी विक्रम गावस आणि पोलिस हवालदार साहिल पाल बागा बीचवर गस्त घालत असताना त्यांना एक पुरुष पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडणार असल्याचे लक्षात आले. दोघांनीही घटनास्थळी धाव घेऊन जीवरक्षक सूरज निभाळकर व सिद्धेश भोसले यांच्या मदतीने सिद्धार्थ एस. कमडोळी (२४, रा. हुबळी कर्नाटक) या पर्यटकाला समुद्रातून सुखरूप बाहेर काढले आणि त्याच्या जीव वाचवला.

Goa Tourist
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

शनिवारी पोलिस कॉन्स्टेबल निखिल नाईक आणि त्यांचे सहकारी चेतन गावडे, होमगार्ड महम्मद आसिफ आणि ट्रॅफिक पोलिस युनिटच्या महिला होमगार्ड स्वेथा देविदास यांना कोलवा बीचवर गस्त घालताना एक महिला पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसली.

या सर्वांनी घटनास्थळी धाव घेत जीवरक्षक किशन नाईक व समीर वेळीप यांची तातडीने मदत घेऊन नॅन्सी वर्मा (२४) रा. लखनौ, उत्तर प्रदेश या पर्यटकाला पाण्यात बुडण्यापासून वाचवले.़

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com