Panaji Junta House: लिफ्टमध्ये अडकले दोन मजूर; पणजी जुनता हाऊसमधील घटना

बकरी ईद, आषाढी एकादशीनिमित्त कार्यालयाला सुट्टी असल्याने इमारतीत कुणीही नव्हते
2 stuck in Panaji Junta House building lift
2 stuck in Panaji Junta House building liftDainik Gomantak
Published on
Updated on

2 stuck in Panaji Junta House building lift: गोव्याची राजधानी पणजीमध्ये सरकारी इमारत असलेल्या जुनता हाऊसमधील लिफ्टमध्ये दोघे जण अडकल्याची घटना गुरूवारी घडली. हे दोघेही मजूर असल्याचे सांगितले जात आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली.

2 stuck in Panaji Junta House building lift
Goa Rain Update: राज्यात मुसळधार सुरुच, पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

हे दोघेही मजूर या इमारतीत वरच्या मजल्यावर झोपी गेले होते. जाग आल्यावर जेव्हा ते खाली येण्यासाठी इमारतीच्या लिफ्टमध्ये आले तेव्हा लिफ्ट दोन मजल्यांच्यामध्येच अडकून बसली. सकाळी 11पासून हे दोघेही लिफ्टमध्ये अडकून बसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पणजीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारनंतर या दोघांची अर्ध्यातासाच्या प्रयत्नांनंतल लिफ्टमधून सुटका केली. अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाल्याने त्यांना लिफ्टमधून बाहेर पडता आले नाहीतर त्यांना तिथेच अडकून पडावे लागले असते.

बकरी ईद आणि आषाढी एकादशीनिमित्त गुरूवारी पणजीत सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे जुनता हाऊस इमारतीत तसेच इमारतीच्या आवारात कुणीही उपस्थित नव्हते. हे मजूर इमारतीत कशासाठी आले होते, ते काय काम करत होते, सुट्टीदिवशी त्यांचे काम सुरू होते किंवा नाही याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com