Goa Fire News: दिवसभरात आगीच्या दोन घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली
Goa Fire News
Goa Fire NewsDainik Gomantak

Goa Fire News: आज (28 नोव्हेंबर) आगीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. भाटले-पणजी येथील मशिदी जवळील सरकारी वसाहतीमध्ये मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

Goa Fire News
MLA Carlos Ferreira: सरकारने राज्यातील बांधकामांची नियमित देखभाल करणे आवश्यक!

दरम्यान, यामध्ये किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे

तर दुसरीकडे, हरमल येथे सुक्या गवताला आग लागली. ही आग पसरत चालल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. दलाच्या जवानांनी लगेचच आग विझवायला सुरुवात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com