ग्रामीण भागातच खरी संस्कृती: पी. एस. श्रीधरन पिल्लई

शेतकऱ्यांशी संवाद : सांगेतील कुळागराला दिली राज्यपालांनी भेट
पी. एस. श्रीधरन पिल्लई
पी. एस. श्रीधरन पिल्लईDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: खऱ्या अर्थाने भारत खेड्यात नांदतो. ग्रामीण भागातील लोक मनाने चांगले असतात. परिणामी गावातील लोकांची कार्यक्षमता चांगली असते व ते चांगले काम कमकरू शकतात. ग्रामीण भागातच खरी संस्कृती पहावयास मिळते, असे उद्‍गार राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.

रिवण सांगे येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग पाटील यांच्या कुळागराला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष फळदेसाई, प्रकाश वेळीप, जिल्हा कृषी अधिकारी राजेश देसाई, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक चंद्रहास देसाई उपस्थित होते. राज्यपाल पिल्लई म्हणाले, देशाचा विकासात शेतकऱ्यांची भूमिका श्रेष्ठ असते. आपल्या देशाचा जीडीपी 17 ते 18 टक्के कृषी क्षेत्रातून प्राप्त होतो. शेती हे आपल्या देशाला स्वावलंबी बनवणारे क्षेत्र आहे. मी सुद्धा केरळमधील एका गावातच राहतो याचा मला अभिमान आहे. आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य तसेच ग्रामस्वराज्य हे केवळ शेतीद्वारेच प्राप्त होऊ शकते. पांडुरंग पाटील यांच्या शेतीप्रती समर्पित वृत्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आपणही राजभवनाच्या 88 एकर जागेत कृषी संबंधित काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.

पी. एस. श्रीधरन पिल्लई
पेडणे नगराध्यक्षपदी माधव देसाई बिनविरोध निवड

आमदार फळदेसाई म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्याचे औदार्य दाखविणारे पी. एस. श्रीधरन पिल्लई हे गोव्याच्यादृष्टीने पहिले राज्यपाल आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना मार्गी लावल्या आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होत आहे असे त्यांनी सांगितले. भाजपा सरकार हे अंतोदय तत्त्वावर चालणारे सरकार असून, सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सदोदित कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे असे फळदेसाई यांनी सांगितले.

जिल्हा कृषी अधिकारी राजेश देसाई यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. तर आत्मा प्रकल्प संचालक चंद्रहास देसाई यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com