New Zuari Bridge: नवीन केबलस्टेड झुआरी पूलवर वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक- शैलेश नार्वेकर

New Zuari Bridge: झुआरी नदीवरील नवीन पुलावरून जाताना वाहनचालकांनी सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

New Zuari Bridge: दक्षिण ते उत्तरेला जोडणारा महत्त्वाचा झुआरी नदीवरील केबल स्टेड पूल काल शुक्रवारी पासून सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. वाहनचालकांनी झुआरी नदीवरील नवीन पुलावरून जाताना सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच उत्तरेतून दक्षिणेत येताना नवीन पुलाच्या एका मार्गाने फक्त अवजड वाहने तेवढीच सोडण्यात येतील. इतर वाहनांनी झुआरी नदीवरील पूर्वीच्या जुन्या पुलावरून सासष्टी (मडगाव), मुरगाव (वास्को) येथे जाण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी केले आहे.

झुआरी नदीवरील केबल स्टेड पुलाचे गुरुवारी (ता.29) केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी (ता.30) दुपारी हा पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. यावेळी पुलावर दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस, दिलीप बिल्डकॉनचे अभियंते, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

New Zuari Bridge
Goa Tourist Crime : कोलव्यात रशियन नागरिकाकडून सॅटेलाइट फोनचा वापर; फोन जप्त करत गुन्हा दाखल

वेर्णा सिग्नलकडे वाहतूक कोंडी

राष्ट्रीय महामार्ग पणजी ते मडगाव अशा जुन्या पुलावरून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ आता वेर्णा येथील सिग्नलकडे खोळंबून पडत आहे. या पल्ल्यात महामार्गाच्या बाजूतील माती खोदून रस्ता रुंदीकरण करण्यात येत असल्याने या सिग्नलकडे वाहतूक खोळंबते.

वेर्णा औद्योगिक वसाहतीकडे जाणारा क्राॅस मार्ग असल्याने अनेक वाहने वसाहतीत जाण्यास वळसा घेत असतात. सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाने हे काम गतिमान करून या समस्येवर उपाय काढावेत, अशी मागणी होत आहे.

शैलेश नार्वेेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक वास्को-

नवीन केबल स्टेड पुलावर प्रत्येक वाहनचालकांनी 40 पेक्षा कमी वेगमर्यादेने वाहन चालविणे महत्त्वाचे आहे. या पुलावर वाहन थांबवल्यास त्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच या पुलावरून चालणे बंधनकारक आहे. कोणी पुलावरून चालताना आढळल्यास त्याच्यावर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com