Bicholim News : डिचोली शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच

Bicholim News : बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस होतोय अडथळा
Traffic congestion
Traffic congestionDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News : डिचोली, शहरात पुन्हा वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी रात्री बाजारातील रस्त्यावर तर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क केल्याने ही समस्या निर्माण झाली. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दुसऱ्या बाजूने बंदी असूनही बगलमार्गावर अवजड वाहने पार्क करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. शहरातील वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई अधिक कडक करावी. अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.

शहरातील ठराविक भागात अधूनमधून वाहतूक कोंडी होत असली, तरी विशेष करून बाजारातील रस्ता आणि सोनारपेठ-पाजवाडा रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. शहरातील कदंब बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तर वाहतूक कोंडीचे प्रकार सर्रासपणे अनुभवायला मिळतात.

विशेष करून बुधवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी तर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते. या रस्त्यावर बेशिस्तीने वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत असते.

मध्यंतरी वाहतूक पोलिस विभागातर्फे बेशिस्त पार्किंग विरोधात दंडात्मक कारवाई हाती घेतल्यानंतर वाहतूक बेशिस्त पार्किंगचे प्रकार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा बेशिस्त पार्किंगच्या समस्येने डोके वर काढले आहे.

Traffic congestion
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

बंदी असतानाही पार्किंग

बसस्थानक ते शिवाजी महाराज सर्कलपर्यंतचा बगलमार्ग ''नो पार्किंग'' क्षेत्र म्हणून अधिसूचित केला आहे. या बगलमार्गावर वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे.

तरीदेखील या बगलमार्गावर वाहने पार्क करण्याचे प्रकार चालूच आहेत. रात्रीच्या वेळी तर हमखास या बगलमार्गावर अवजड वाहने उभी ठेवलेली आढळून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com