Mapusa Crime News: ट्रॅफिकमध्ये बाजू न दिल्याने पुण्यातील पर्यटकांना मारहाण!

पोलिसांनी प्रवासी बस चालक व वाहक या दोघांना अटक केली.
Mapusa Crime News
Mapusa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Crime News: कळंगुट येथे वाहतुकीची कोंडी असूनही बाजू न दिल्याच्या कारणावरून पुण्यातील पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवासी बस चालक कॅजी लॉरेन्स डिसोझा (41, रा. हणजूण) व वाहक साहील काशीनाथ जाधव (18, रा. पर्रा) या दोघांना अटक केली.

ही घटना शुक्रवार 12 रोजी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास कळंगुट येथील शांतादुर्गा मंदिराजवळ घडली. या मारहाणीत प्रतिक सिताराम अल्हात व सुल्तान शेख (दोघेही रा. पुणे) हे पर्यटक जखमी झाले. याप्रकरणी करिम सय्यद (रा. पुणे व मूळ ठाणे) यांनी पोलिसांत तक्रार गुदरली आहे.

Mapusa Crime News
Goa News 14 January 2024: 22 पर्वरीत फ्लायओव्हरचे काम, चोरी- अपघातांसह अन्य घडामोडी वाचा...

फिर्यादी व त्याचे मित्र सुल्तान शेख, आकांशारेलकर, पूजा अल्हात व प्रतिक अल्हात हे पाचजण गोव्यात बुधवार दि.10 जानेवारी रोजी पर्यटनासाठी पुण्याहून आले होते व ते हणजूण येथील एका गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होते.

12 रोजी हे पाचही जण कळंगुटमध्ये आले होते. संध्याकाळी कळंगुटहून ते हणजूणमध्ये जात होते. यावेळी वाटेत श्री शातांदुर्गा मंदिरजवळ मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाले होती. त्यामुळे या पर्यटकांच्या तिन्हा दुचाकी या कोंडीत अडकल्या होत्या.

जीए 03३ डब्ल्यू 0529 क्रमांकाचची कळंगुट म्हापसा मार्गावरील प्रवासी बस आली व हॉर्न मारू लागली. फिर्यादी करीम हा एमएच 14 जेए 0762 क्रमांकाच्या स्कुटरवरून बसच्या समोर होता. त्यांनी समोर वाहतूक असल्यामुळे गाडी पुढे घेणे शक्य नसल्याचे त्याने बस चालकाला हातवारे करून सांगितले.

संशयित बस चालक व वाहकाने बसमधून खाली उतरून फिर्यादीला जाब विचारला व बस समोरून गाडी काढण्यास सांगितले. तेव्हाही फिर्यादीने दुचाकी काढणे शक्य नसल्याचे सांगितले.

तेव्हा संशयित बस वाहक आणि चालकाने त्याच्याशी वाद घातला. यावेळी करीम याचे मित्र प्रतीक आणि सुल्तान हे त्याच्या मदतीला आले. तेव्हा दोघांही संशयितांनी शिवीगाळ घालून वरील जखमींना मारहाण केली.

तसेच संशयित बस वाहकाने सुल्तान याच्या तोंडावर हातात कडा असलेला बुक्का मारला, शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत आकांशा रेलकर हिचा मोबाईल फोन व सोनसाखळी, सुल्तान याची सोनसाखळी व प्रतिक याची 5500 रोकड व महत्वाची कागदपत्रे आणि वरील मुद्देमाल हरवला.

जखमीवर उपचार

घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले व जखमींवर कांदोळी आरोग्य केंद्रात उपचार केले. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे संशयित बस चालक व वाहकाविरूध्द मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक नरेशकुमार साळगावकर करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com