Tiswadi : सांतान चर्च जवळील संरक्षक भिंत कोसळली, बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

कामाच्या दर्जाबाबत शंका : सांतआंद्रे-सांतान चर्चजवळील घटना; रस्ता बंद
Tiswadi Rain
Tiswadi RainDainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi : सांतआंद्रे मतदारसंघातील सांतान चर्च येथील उतरणीवरील संरक्षक भिंत बुधवारी (ता.२८) पहाटे कोसळली. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून सुदैवाने जीवितहानी टळली. त्यामुळे झालेल्या बांधकामावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

रस्त्याला भेगा पडल्याने ही संरक्षक भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती. परंतु मंगळवारी रात्री जोरात पाऊस सुरू झाल्यानंतर अखेर भिंत कोसळली. हल्लीच या संरक्षक भिंतीचे काम झाले होते. एवढ्या कमी काळात ती कोसळल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम झाले होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केला आहे.

4 दिवसांपासून रस्त्याला भेगा पडल्या होत्या, त्यामुळे तेथे दगड घालून हा भाग अडवला होता. यासंबंधी व्हिडिओद्वारेदेखील जागृती करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पाहाटे ४ ते ५ वा. सुमारास ही भिंत कोसळली. त्यानंतर येथील वाहतूक थांबवण्यासाठी बॅरिकड्‌सड लावले गेले.

- प्रीतेश आडपईकर, पंच, कुडका-बांबोळी-तळावली पंचायत

रस्त्याच्या वरचा भाग कमकुवत बनल्यामुळे दबाव वाढल्याने खालचा भाग कोसळला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी अंदाजे खर्च तयार केला आहे. परंतु याबाबत साबांखाची ई-निविदा प्रक्रिया असल्याने हे काम कधी पूर्ण होणार हे सांगता येणार नाही.

- वीरेश बोरकर, आमदार, सांतआंद्रे

Tiswadi Rain
Tiswadi Farmer : शेतजमीन हस्तांतरण विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे

संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. भिंतीचा पाया योग्य पद्धतीने न रचल्याने ही भयंकर घटना घडली आहे. पाणी जाण्यासाठी सोयदेखील केली होती. तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला असता, तर भिंत कोसळली नसती.

- कर्नल मिलिंद प्रभू, रस्ता तज्ज्ञ

सांतान चर्चजवळ असलेल्या रस्त्याचा भाग खचल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने काँक्रिट घालून तात्पुरती व्यवस्था केली होती. परंतु यासंदर्भात मंगळवारी चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर बुधवारी ही सरंक्षक भिंत कोसळली. आता जुलै महिन्यात तौशांचे फेस्त होणार आहे. त्यामुळे आता येथील लोकांची आणि येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे.

- प्रा. रामराव वाघ, उपाध्यक्ष, आप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com