Tiswadi Farmer : शेतजमीन हस्तांतरण विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे

चोडण येथील शेतकऱ्यांची मागणी; बैठकीत ठरावही संमत
Shankar Phadte
Shankar PhadteGomantak Digital Team
Published on
Updated on

Tiswadi Farmer : चोडण येथील शेतकऱ्यांच्या जाहीर सभेत राज्य सरकारने मंजूर केलेल्या शेतजमीन हस्तांतरण विधेयकाचा जाहीर निषेध करण्यात आला. हे विधेयक सरकारने त्वरित मागे घेण्याची जोरदार मागणी करून या विषयी एकमताने ठराव मंजूर करण्यात आले.

व्यासपीठावर गोवा कूळ संघर्ष समितीचे पदाधिकारी दिपेश नाईक, संजय बर्डे, जनार्दन ताम्हणकर, सल्लागार- अ‍ॅड. शंकर फडते, प्रमुख वक्ते संतोष मांद्रेकर, सामाजिक कार्यकर्ते- रामा काणकोणकर, चोडण-माडेल पंचायतीचे सरपंच - पंढरी वेर्णेकर, चोडणचे माजी सरपंच तथा वारण-पात्रामण शेतकरी संघटनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष- श्रीकृष्ण हळदणकर व सरचिटणीस -सुभाष खांडेपारकर व्यासपीठावर उपस्थित होते.

Shankar Phadte
Tiswadi Farmer : मामलेदारांचे आश्‍वासन ; नवी शेतकरी संघटना स्थापन करण्याचा आदेश

श्रीकृष्ण हळदणकर यांनी स्वागत केले. चोडण शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत अ‍ॅड. फडते यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष - कृष्णनाथ खांडेपाकर व पिटर वाझ यांनी आपले विचार व्यक्त केले.

Shankar Phadte
Tiswadi Traffic Jam : चोडण फेरीधक्क्यावर वाहनांची कोंडी; प्रवाशांची उडाली तारांबळ

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी- शशिकांत मांद्रेकर, आनंद कुंडईकर, संजीव सुर्लीकर, सिध्देश कवठणकर यांनी स्वागत केले. उपस्थित वक्त्यांनी कृषीजमिन हस्तांतरण विधेयक शेतकरी हिताचे नसून गरीब शेतकऱ्यांना कसे त्रासदायक आहे, याची सविस्तर माहिती दिली.

निषेधाचाही ठराव...

माडेल-चोडण येथील श्री देवकीकृष्ण सभामंडपात गोवा कूळ व मुंडकार संघर्ष समिती व चोडण येथील वारण-पात्रामण शेतकरी संघटनेतर्फे रविवारी सभा घेण्यात आली. ‘कसेल त्याची जमीन आणि राहिल त्याच घर’ अंतर्गत कूळ-मुंडकाराचे सर्व्हेक्षण करणे व त्यांना सनदी देणे.

Shankar Phadte
Tiswadi beach: तिसवाडी येथे 'सिनॉय मायडीस' प्रजातीच्या कासवाला जीवदान

शेतकऱ्यांना कूळ-मुंडकार कायद्यानुसार सर्व लाभ देणे, असे ठराव घेण्यात आले. चोडण बेटावरील वारण व पात्रामण खाजन शेतीचा ताबा तिसवाडी मामलेदारानी लेखी मागणी करूनही गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्याकडे अजूनही न दिल्याने मामलेदारांचा निषेध करण्याचा ठराव घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com