सासष्टी: मडगावच्या जुन्या बाजारात वर्षपद्धती प्रमाणे उद्या (रविवार) पासून होली स्पिरीट चर्च फेस्त निमित्त फेरी भरणार आहे. ही फेरी एक आठवडाभर असेल. या फेरीसाठी यंदा मडगावच्या नगरपालिकेने जय्यत तयारी केली असून फेस्त फेरीत कुठल्याही अडचणी भासू नयेत, याची दक्षता घेतली आहे. आज सायंकाळपर्यंत विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटायला सुरवात केली आहे.
(This year 300 shops in margao Fest)
ही फेस्त फेरी नगरपालिकेच्या जागेत तसेच एसजीपीडीए मैदानावर भरणार आहे. जुन्या मार्केटमधील तिठ्ठ्यावर सुकी मासळी, सोले, आमटाण तसेच इतर घरगुती सामानाची विक्री होणार आहे. एसजीपीडीए मैदानावर जास्त करुन फर्निचरची दुकाने तर नगरपालिकेच्या जागेत खेळणी, कपडे, महिलासाठीच्या इमिटेशन ज्वेलरीची दुकाने थाटली जाणार आहेत.
या फेस्त फेरीसाठी नगरपालिकेने चांगली तयारी आहे. आम्ही 450 दुकांनासाठी जागांची आखणी केली होती. अजूनपर्यंत 300 पेक्षा जास्त विक्रेत्यांनी नावनोंदणी केली आहे. यामुळे नगरपालिकेला महसूल मिळेल, असे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितले.
प्लास्टिकचा वापर टाळा !
आपापली दुकाने रात्री 10.30 पूर्वी बंद करावीत, असे विक्रेत्यांना सांगितले आहे. शिवाय त्यांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरायला सांगितले आहे. रस्त्यावर लोकांना वाहने ठेवता येणार नाहीत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी खास समिती नियुक्त केल्याचे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.