जलसंधारण प्रयत्नांमध्ये 'हे' राज्य ठरले सर्वोत्तम

शेखावत म्हणाले की, देशाला कृषी, सिंचन, औद्योगिक आणि घरगुती गरजा भागवण्यासाठी दरवर्षी 1,000 अब्ज घनमीटर पाण्याची गरज आहे.
Water Conservation
Water Conservation Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शुक्रवारी देलेल्या माहितीनुसार, 2020 साठी जलसंधारण (Water Conservation) प्रयत्नांमध्ये उत्तर प्रदेशने (Uttar Pradesh) सर्वोत्तम राज्य म्हणून स्थान मिळवले आहे. जलसंधारणासाठी केलेल्या कामासाठी राजस्थानला (Rajasthan) द्वितीय आणि तामिळनाडूला (Tamil Nadu) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. (Water Conservation News)

Water Conservation
पाचही राज्यांतील विधानसभा उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 'इतकी' वाढ

शेखावत म्हणाले की, देशाला कृषी, सिंचन, औद्योगिक आणि घरगुती गरजा भागवण्यासाठी दरवर्षी 1,000 अब्ज घनमीटर पाण्याची गरज आहे. पाण्याचा (Water) वापर वाढत असला तरी त्याची उपलब्धता कमी होत आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. 2050 पर्यंत पाण्याची मागणी 1,000 अब्ज घनमीटरवरून 1400-1500 अब्ज घनमीटरपर्यंत वाढेल. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारून प्रभावी पावले उचलून आपण एकत्र पुढे जायला हवे.

Water Conservation
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 7 दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य

मुझफ्फरनगरला उत्तर विभागातील सर्वोत्तम जिल्ह्याचा पुरस्कार
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला उत्तरेकडील सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला, तर पंजाबमधील शहीद भगतसिंग नगरला द्वितीय पुरस्कार मिळाला. दक्षिणेत, केरळमधील (Kerala) तिरुअनंतपुरमला सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com