Sada Waste Management Plant: हेडलॅण्ड सडा प्रकल्‍प ‘कचऱ्यात’; गेल्‍या काही महिन्‍यांपासून बंदच!

Sada Waste Management Plant: मुरगाव नगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्‍पाची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून तो तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्‍यात येत आहे.
The Waste Management  plant at Sada has been closed for the past few months
The Waste Management plant at Sada has been closed for the past few monthsDainik Gomantak

Sada Waste Management Plant: हेडलॅण्ड सडा येथील कचरा विल्हेवाट प्रकल्‍पाची दुर्दशा झालेली आहे. नियोजनाचा अभाव आणि आडमुठे धोरण यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकल्‍प बंदच आहे. मुरगाव नगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्‍पाची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून तो तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

हेडलॅण्ड सडा येथील एमपील रुग्णालयाजवळ हा प्रकल्‍प असून आतमध्ये पाच व्हीलिंग मशिन्स आहेत. या मशिन्सद्वारे तेथे आणून टाकण्यात आलेला कचरा प्रथम कर्मचारी वेगळा करतात. त्‍यानंतर तो बांधून त्याचा एकेक गठ्ठा करून ते सोलापूर येथे सिमेंट कारखान्यासाठी पाठवले जातात. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. परंतु या पाच मशिन्‍सपैकी एक मशिन दार तुटल्यामुळे, दुसरे बंद पडल्‍यामुळे, तिसऱ्या मशिनची वायर उंदरांनी कुडतरून टाकल्‍यामुळे तर चौथे मशिन मॅन्युअल दुरुस्तीसाठी बंद आहे. त्‍यामुळे सध्या फक्त एकच मशिन कार्यरत आहे, जे अपुरे आहे.

The Waste Management  plant at Sada has been closed for the past few months
Goa Wet Waste Disposal: ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गोवा सरकार वापरणार इस्रायली तंत्रज्ञान

या कचरा प्रकल्‍पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा साठविल्याचे दिसून येत आहे. भिंतीला लावळेळे पत्रे उखडल्याने कचरा बाहेर पडत आहे. दरवाजा नेहमीच उघडे असल्याने भटकी गुरे, कुत्रे त्‍या कचऱ्यावर मनसोक्त ताव मारून नंतर तो रस्‍त्‍यावर आणून टाकत आहेत. त्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

सदर कचरा प्रकल्‍पातून काकोडा प्लांटमध्ये दररोज १.५ मेट्रिक टन कचरा नेला जातो. विशेष म्हणजे या हेडलॅण्‍ड सडा येथील या प्रकल्‍पात मनुष्यबळाची कमतरता आहे. केवळ तीन कामगार तैनात असून, त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात कौन्सिल अपयशी ठरली आहे. टॉयलेटची दुरवस्था झाली असून दरवाजा तुटलेला आहे.

The Waste Management  plant at Sada has been closed for the past few months
Waste Project Issue: वैद्यनगर येथे कचरा प्रकल्प नको

मंगेश नाईक, हेडलॅण्‍ड-सडा, वास्‍को

गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्‍या सतावत आहे. मात्र याकडे कोणीही गंभीरपणे लक्ष दिलेले नाही. मुरगाव नगरपालिकेला तर त्याचे काहीच सोयरसुतक नाही. नको त्या प्रश्‍‍नांवर आवाज उठविणाऱ्या स्वयंघोषित संस्था आत कुठे झोपल्या आहेत?

मिनेश नाईक, लॅण्‍ड-सडा, वास्‍को

कचऱ्याचा हा विषय अत्यंत गंभीर आहे. शेकडो मेट्रिक टन कचरा या प्रकल्‍पात पडून आहे, जो हळूहळू समुद्रात जात आहे. या प्रकल्‍पातील कामगारांची संख्‍या वाढवून अधिक कार्यक्षम यंत्रे उपलब्‍ध करून दिली पाहिजेत, जेणेकरून स्थिती सुधारेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com