Goa E - Vehicle : सरकारचे हरित धोरण योग्य मार्गावर; ई - वाहन खरेदीला उत्तम प्रतिसाद

सरकारचे हरित धोरण योग्य मार्गावर : अनुदान योजना सुरू झाल्यास खेरदी वाढवण्याची शक्यता
E - Vehicle
E - VehicleGomantak Digital team
Published on
Updated on

Tiswadi : राज्यात ई-वाहनांची खरेदी दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाहनांच्यासंदर्भात सरकारचे हरित धोरण योग्य मार्गावर आहे. २०२३ आतापर्यंत एकूण ४,२८५ ई - वाहन खरेदी झाल्याची नोंदणी झाली आहे. तसेच राज्य सरकारचा बंद झालेली अनुदान योजना पुन्हा सुरू होणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

केंद्रीय वाहन संकेतस्थळावरून मिळालेल्या आकडेवारी अनुसार 2022 मध्ये एकूण 5,686 ई – वाहनांची राज्यात नोंदणी झाली होती. या वर्षी सहा साडे पाच महिन्यातच हा आकडा गाठण्यात आला आहे. त्यामुळे 2023 मध्ये ई - वाहनांची खरेदी विक्रमी होणार आहे. गत वर्षी जूनपर्यंत दोन हजार 249 वाहनांची नोंदणी झाली होती, या वर्षी याच कालावधित हा आकडा चार हजार 285 झाला आहे. त्यात अजूनही जूनचे 17 दिवस शिल्लक आहे.

E - Vehicle
Tiswadi Farmer : शेतजमीन हस्तांतरण विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे

केंद्राच्या हरित धोरण गोव्यात लागू करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने देखील आपला अनुदान निधी सुरू केला होता, परंतु गेल्या वर्षी ऑगस्टपासून हा बंद करण्यात आला होता.अनुदान बंध झाल्यानंतर देखील वाहन खरेदी बऱ्यापैकी सुरू आहे. आता हा निधी पुन्हा सुरू करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई – वाहन खरेदीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

2023 मध्ये आतापर्यंत सरासरी ई -वाहन श्रेणीत चार चाकी वाहन खरेदी 60 ते 70 वाहन प्रति महिना आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही चांगली असून आता राज्य सरकारने आपला अनुदान निधी योजना पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. एकदा हा अनुदान पुन्हा सुरू झाल्यानंतर ई – वाहन खरेदीला आणखी वेध येणार आहे. त्याशिवाय बाजारात नवीन चार चाकी ई - वाहने येत असल्याने ग्राहकांमध्ये उत्साह आहे.

- व्यंकटेश मराठे, विक्री व्यवस्थापक, दुर्गा मोर्ट्स

E - Vehicle
Tiswadi Traffic Jam : चोडण फेरीधक्क्यावर वाहनांची कोंडी; प्रवाशांची उडाली तारांबळ

गोव्यातील ईव्ही उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. आमची संख्या गेल्या वर्षीच्या दुप्पट आहे आणि एकूण दुचाकी बाजारपेठेच्या 10 टक्क्यांपर्यंत आहे. सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन हे टॉप व्हेरियंट आहे आणि गोव्यातील लोक अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरक्षा वैशिष्ट्ये आणि एथर सर्व दुचाकी वाहनांमध्ये देत असलेल्या उच्चस्तरीय कामगिरीमुळे ग्राहक आकर्षिले जात आहेत. केंद्र सरकारने अनुदान कमी केल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच ग्राहक येत आहेत.याचा अर्थ गोवावासीयांना ईव्ही दुचाकींचे फायदे समजले आहेत. -करंजीव सिंग, मालक, एथर शोरुम पर्वरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com