Colvale Jail: कैदी गायब झाल्याने कारागृहाच्या कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ, अखेर...

पुन्हा एकदा कोलवाळ कारागृह चर्चेत आले आहे
 Colvale Jail Goa
Colvale Jail Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

कोलवाळ कारागृह (Colvale Central Jail) या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. कधी जेलर आणि रक्षक यांची मारहाण, कधी कैद्यांची मारहाण तर, कधी तुरूंगाधिकारी यांच्यावर हल्ला अशा विविध घटनांमुळे कोलवाळ कारागृह मागील वर्षभर चर्चेत होते.

आता पुन्हा एकदा कोलवाळ कारागृह चर्चेत आले आहे. झालंय असं कि, कारागृहात असलेल्या अभिषेक नामक एका कैद्याला सुनावणी करिता न्यायालयात नेण्यात आले होते.

मात्र न्यायालयातील सुनावणीनंतर परत आलेला हा कैदी शुक्रवारी अचानक गायब झाला असल्याचे कारागृह कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. दरम्यान कारागृहातील सर्व यंत्रणा सतर्क झाली. सर्वत्र शोधाशोध सुरु झाली.

कैदी गायब झाल्याने कोलवाळ कारागृहाच्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अखेर शुक्रवारी मध्यरात्री एका खोलीत लपून बसलेल्या या कैद्याला शोधून काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com