Goa Police: भाडेकरू पडताळणी थंडावली ; छाननीत पोलिसांना अडचणी

Goa Police on Tenet Verification: त्यातील माहिती विविध राज्यांतील पोलिसांकडून मिळण्यास उशीर होत असल्याने त्यात अडचणी येत आहेत,अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
Goa Police on Tenet Verification
Goa Police on Tenet VerificationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police on Tenet Verification: पणजी, राज्यात बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी भाडेकरूंची पडताळणी मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम त्यावेळी अधिक तीव्र करून भाडेपट्टीवर खोल्या दिलेल्या मालकांविरोधात कारवाईचा इशारा दिल्यानंतर पोलिसांत गर्दी होऊ लागली होती.

मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांकडून या मोहिमेकडे दुर्लक्ष होत असल्याने मोहीमच थंडावली आहे. यावर्षी आतापर्यंत राज्यात ५० हजारांहून अधिक भाडेकरूंची माहिती अर्ज आले.

मात्र, त्यातील माहिती विविध राज्यांतील पोलिसांकडून मिळण्यास उशीर होत असल्याने त्यात अडचणी येत आहेत,अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

काही महिन्यांपासून पोलिस स्थानकात भाडेकरूंची तसेच विविध आस्थापनांतील परप्रांतीय कर्मचाऱ्यांची माहिती देण्यासाठी गर्दी असायची, ती आता कमी झाली आहे.

पोलिसांनी या अर्जांच्या छाननीसाठी संबंधित राज्यांतील पोलिस स्थानकांकडे अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर ते पाठवले आहेत.

त्याची माहिती संबंधित पोलिसांकडून मिळण्यात उशीर होत आहे. त्यामुळे त्यातील कोणी गुन्हेगार असल्यास त्याविरुद्ध कारवाई करणे शक्य होत नाही.

पोलिस स्थानक क्षेत्रात नेमलेल्या बीट पोलिसांना भाडेकरूंनी माहिती पोलिसांत जमा केली आहे की, नाही हे पाहण्याची जबाबदारी दिली होती. या पोलिसांनी काही महिने त्याची कार्यवाही केली,पण नंतर ही मोहीमच थंडावली.

गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने लहान-सहान नोकऱ्यांसाठी परराज्यांतून मोठ्या प्रमाणात लोक गोव्यात येतात. बहुतेक हे लोक मजूर असतात. काम मिळेल तिथे भाडेपट्टीवर खोल्या ते घेऊन राहतात.

या मजुरांची त्यांच्या पत्त्यावर जाऊन माहिती घेईपर्यंत ते तेथून अन्यत्र गेलेले असतात,असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात राहणाऱ्या विदेशींच्या पासपोर्टची तपासणी हाती घेतली आहे.

Goa Police on Tenet Verification
Goa Police : दुचाकीस्वारांनो,आता तरी हेल्मेट वापरा ! फूल देऊन नियम न मोडण्याचे आवाहन

अनेकजण व्हिसा संपला तरी रहात असल्याचे आढळून आल्याने त्यांना म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवून त्यांच्या देशात पाठवण्यात येत आहे. त्यामुळे काही विदेशी वारंवार ठिकाण बदलत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

गोवा बनलेय गुन्हेगारांचे आश्रयस्थान

गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेय हे उघड आहे. गेल्या काही वर्षात इतर राज्यात गुन्हे करून गोव्यात लपून बसलेल्यांना त्या राज्यातील पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

त्यात खून, बलात्कार, चोऱ्या तसेच दहशतवादी कारवाया, बोगस कॉल सेंटर तसेच क्रिकेट सट्टेबाजी चालवल्याच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे. गोवा हे सुरक्षित राज्य व पर्यटक येथे येत असल्याने गुन्हेगारांना लपण्यास मदत होत आहे.

म्हणून थंडावते मोहीम !

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विधानसभा अधिवेशन व त्यानंतर गणेशोत्सव काळात पोलिसांना इतर जबाबदाऱ्या देण्यात येत असल्याने या कामासाठी आवश्‍यक असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडतो. त्यामुळे अनेकदा ही मोहीम काही काळापुरती थांबवावी लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com