Goa Police : दुचाकीस्वारांनो,आता तरी हेल्मेट वापरा ! फूल देऊन नियम न मोडण्याचे आवाहन

बरेच दुचाकीस्वार हेल्मेट न घालता दुचाकी चालवतात व जेव्हा अपघात घडतो, त्यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागून मृत्यू येऊ शकतो
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police : केपे, राज्यात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असून यानिमित्त आज कुडचडे येथे वाहतूक पोलिसांनी काकोडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर जाऊन वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध जनजागृती केली.

हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या चालकांना चक्क गुलाबाचे फूल देऊन आता हेल्मेट घातले नाही, निदान यापुढे तरी वापरा, असे सांगून गांधीगिरी केली.

आज सकाळी कुडचडे वाहतूक पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी काकोडकर विध्यालयच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाविषयी माहिती दिली व यावेळी कुडचडे बाजारात फिरून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फुल देऊन नियमांचे पालन करावे असे सांगितले.

बाजारात खास करून दुचाकीचालक हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याने हेल्मेट घालावे कारण गंभीर जखम होण्यापासून ते आपला बचाव करते, असे विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना सांगितले.

बरेच दुचाकीस्वार हेल्मेट न घालता दुचाकी चालवतात व जेव्हा अपघात घडतो, त्यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागून मृत्यू येऊ शकतो. यासाठी सगळ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करून आपली वाहने चालवली पाहिजेत,

असे आवाहन पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी केले.यावेळी काकोडकर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी कुडचडे वाहतूक पोलिसाबरोबर कुडचडे बाजारातून फेरी काढून जागृती केली.

Goa Police
Dhangar Samaj: सांगेत धनगर समाजाचा महोत्सव

मुलांकडे वाहने नकाे !

कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी सांगितले,की लोकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवल्यास अपघातांची संख्या बरीच कमी होऊ शकते.

आज विद्यार्थ्यांसोबत जी जागृती करण्यात आली त्याचा लाभ त्यांना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बरेच शालेय विद्यार्थी चालक परवाना नसताना दुचाकी घेऊन फिरताना दिसतात, हे योग्य नसून पालकांनीही आपल्या लहान मुलांना वाहन देऊ नये, असे कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com