Taleigao Panchyat Election : सुशिक्षितांचे मत कोणाला? ताळगावकर युनायटेडही सक्रिय, २८ रोजी मतदान

Taleigao Panchyat Election : परंतु अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी ज्या घटना घडल्या त्याविरोधात युनाटेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उर्वरित सात ठिकाणचे फ्रंटच्या विरोधातील उमेदवार हे आमचे असल्याचे उघड झाले.
Taleigao Panchyat Election
Taleigao Panchyat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Taleigao Panchyat Election :

पणजी, पंचायत निवडणुकीत सात जागांवर समोरासमोर लढत होत आहे. मंत्री बाबूश व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट'' विरुद्ध सर्वपक्षीय `ताळगावकर युनायटेड'' यांच्यात ही लढत होत आहे.

२८ रोजी मतदान होणार असल्याने सुशिक्षित मतदार कोणाला मतदान करतील, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

ताळगावकर युनाटेडचे रिंगणात असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्तेही आता प्रचारासाठी उतरले आहेत. आमदार मोन्सेरात गटाच्या उमदेवारांकडून अर्ज भरल्यानंतर भेटीगाठींना सुरुवात केली. करंझाळे, मार्टिन्स मोरोड, केवणे, व्हडले भाट या भागात सुशिक्षित मतदारांचा टक्का मोठा आहे, त्यामुळे येथील मतदार आत्तापर्यंत आमदार गटाच्या मागे राहिला आहे. या भागात ताळगावकर युनायटेडचे उमेदवार काय करिश्‍मा करतील, हे पहावे लागणार आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने आमदार मोन्सेरात यांना ही निवडणूक सोपी वाटत होती. परंतु एक वॉर्ड सोडला तर विरोधी गटाकडून सर्वपक्षीय पाठिंब्यावर अपक्ष रिंगणात उतरले, ही एक चिंतेची बाब असणार आहे. तरीही चार उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात आमदार गटाला यश आले. या बिनविरोध निवडलेल्या प्रक्रियेविरोधात ताळगावकर युनायटेडच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार गटावर आरोप केले आहेत.

पंचायतीत आमदार बाबूश यांची निर्विवाद सत्ता राहिली आहे. मंत्रिपद असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो अखेर फसला. ताळगावातील भाजपविरोधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अपक्ष उमदेवारांना अर्ज भरण्यास पाठिंबा दिला. अर्ज भरण्यापर्यंत हे अपक्ष उमेदवार ‘ताळगावकर युनायटेड'' या गटाचे असल्याचे कोणास माहीत नव्हते.

Taleigao Panchyat Election
Goa Today's News Wrap: लोकसभेसाठी 19 अर्ज, लाईनमनचा मृत्यू! गोव्यातील बातम्यांचा आढावा

परंतु अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी ज्या घटना घडल्या त्याविरोधात युनाटेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उर्वरित सात ठिकाणचे फ्रंटच्या विरोधातील उमेदवार हे आमचे असल्याचे उघड झाले. सुशिक्षित मतदारांनी जर युनाटेडच्या बाजूने मतदान केले तर पंचायतीत विरोधी गटाचे पंचसदस्य दिसून येतील, असे सध्या चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com