सुनील कवठणकर: मतांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांवर भाजपचा दबाव

काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निवडणूक कामात गुंतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना टपाल मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याची मुभा असली तरी भाजपकडून या अधिकाऱ्यांवर आपल्‍यालाच मते देण्यासाठी दबाव आणला जात असल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर (Sunil Kavthankar) यांनी आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली.

BJP
Goa Assembly Election: खाणींबरोबरच अन्‍य निकषही महत्त्‍वपूर्ण

काही सरकारी अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या (congress) नेत्यांशी संपर्क साधून टपाल मतपत्रिकांवर भाजपला मतदान करण्यासाठी त्यांना पक्ष कार्यालयात किंवा निवासस्थानी बोलावण्यात आल्‍याचे सांगितले. तसेच समक्ष भाजपला मत मारून ती मतपत्रिका त्यांच्यासमोरच बंद करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

BJP
Goa Assembly Election: भाजप म्हणतो 'आम्हीच मोठा पक्ष'

सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे हा आचारसंहितेच्या उल्लंघनाचा भाग ठरतो. तसेच त्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यासारखेआहे. या प्रकरणाची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आलीआहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com