Goa Crime News: ‘व्हॅलेंटाईन डे’लाच क्रौर्य; एकतर्फी प्रेमातून युवतीवर प्राणघातक हल्ला जाणून घ्या घटनाक्रम

Goa Crime News: एकतर्फी प्रेमातून युवकाने बिअरची बाटली युवतीच्या डोक्यात हाणल्याने ती गंभीर जखमी झाली असून गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले आहे.
Usgao Crime News
Usgao Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: जगभरात बुधवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमदिन साजरा केला जात होता, त्याचवेळी उसगावात एका युवतीवर प्रेमवीराने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली. एकतर्फी प्रेमातून युवकाने बिअरची बाटली युवतीच्या डोक्यात हाणल्याने ती गंभीर जखमी झाली असून गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले आहे.

हा प्रकार बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास उसगाव येथे घडला. पोलिसांनी याप्रकरणी पालवाडा-उसगाव येथील मंथन गावडे (वय २५ वर्षे) याला अटक केली. मूळ बिगर गोमंतकीय; पण गेली अनेक वर्षे तिराळ-उसगाव येथे राहणाऱ्या युवतीवर (वय २३ वर्षे) हा जीवघेणा हल्ला झाला.

पीडित युवती उसगावातील मशरूम फॅक्टरीमध्ये कामाला जाते. कामाच्या ठिकाणी जायला जवळचा पर्याय म्हणून ती तिराळहून आडवाटेने चालत मशरूम फॅक्टरीकडे जाते. या वाटेवर लोकांची वर्दळ कमी असते.

Usgao Crime News
Goa Police: गोवा पोलिसांची कामगिरी सुधारली

ती रोज याच वाटेने जाते, याची माहिती मंथनला होती. म्हणून तो या आडवाटेवर झुडपात लपून बसला. मंथन अचानक तिच्यासमोर उभा राहिला आणि प्रेमाची भाषा करू लागला. तिने मंथनला झिडकारले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि रागात मंथनने तिच्या डोक्यावर बिअरची बाटली हाणली.

यात ती रक्तबंबाळ झाली. जखमी अवस्थेतही ती धावत मुख्य रस्त्यावर आली आणि तिथेच बसली. रुग्णवाहिका बोलावून तिला लोकांनी तिस्क-पिळये आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला गोमेकॉत दाखल केले.

Usgao Crime News
Mopa Airport: ‘मोपा’वर उभे राहणार 300 खोल्‍यांचे हॉटेल

ही युवती तिराळ येथे आई आणि भाऊ यांच्यासोबत छोटेसे घर बांधून राहते. काम करून ती घर चालवते. या घटनेची माहिती तिच्या आईला मिळाल्यानंतर तिला धक्काच बसला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पळून गेलेल्या मंथनला अटक केली आहे.

एकतर्फी प्रेमाची गंभीर परिणती

मंथन आणि पीडित युवती यांच्यात मैत्री होती; पण मंथनने प्रपोज केल्याने तिने त्याला नकार दिला होता. तरीही मंथन तिचा पाठलाग करून धमकी देत असल्याने प्रकरण पोलिसांत गेले होते. पोलिसांनी मंथनला समज दिली होती. तरीही आज ‘व्हॅलेंटाईन डे’ असल्याने मंथनने तिला प्रपोज करण्याचे ठरविले होते. त्यावेळी बाचाबाची झाली.

संशयिताने घेतला पुलाचा आसरा

तरुणीवर हल्ला केल्यानंतर मंथनने घटनास्थळावरून पळ काढला. तो उसगाव पुलाखालील पायऱ्यांजवळ बसला. मात्र, कुणी तरी त्याला तेथे पाहिल्यानंतर पोलिसांना कळविले. पोलिसांना पाहताच त्याने पाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिकस्तीने ताब्यात घेतले.

उसगावातील प्रकार; संशयित गजाआड

मंथन तिस्क-उसगावातील एका चॉकलेटच्या कंपनीत कामाला होता. मात्र, वागणूक चांगली नसल्याने त्याला कंपनी व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले होते. या दिवसांत तो बेरोजगार होता. त्याचे वर्तन ठीक नसल्याने आणि सतत सतावणूक करीत असल्याने युवतीने त्याची मैत्री तोडली होती. तिच्या सततच्या नकारामुळे त्याची मन:स्थिती ठीक नव्हती, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com