Mormugao:नरकासुरवध स्पर्धेत'श्री राम स्पोर्टस' प्रथम; 23 पथकांनी नोंदवला सहभाग

आकाश कंदील स्पर्धेत रक्षंदा च्यारी प्रथम बक्षीस
Narakasura Vadh
Narakasura VadhDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव तालुक्यातील नरकासुरवध स्पर्धेचे प्रथम बक्षीस श्री राम स्पोर्टस अॅण्ड कल्चरल क्लबला प्राप्त झाले. त्यांना रोख 40 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर आकाश कंदील स्पर्धेचे प्रथम बक्षीस रक्षंदा च्यारी याला प्राप्त झाले. बक्षीस वितरण समारंभाला वास्कोचे आमदार कृष्णा साळकर प्रमुख पाहुणे तर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

(Sri Ram Sports won mormugso Narakasura Vadh competition )

Narakasura Vadh
'Beer' किंमतीचा सरकारने पुनर्विचार करावा; विक्रेत्यांनी केली विनंती

मुरगाव हिंदू समाज, श्री महालक्ष्मी पूजनोत्सव समितितर्फे यंदा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दिवाळीच्या पुर्वसंध्येला नरकासूरवथ व आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नरकासूर वध स्पर्धेत प्रकूण 23 पथकांनी भाग घेतला होता. तर आकाश कंदील स्पर्धेत एकूण 13 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :- नरकासुरवध स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये 40 हजार (श्री राम स्पोर्टस अॅण्ड कल्चरल क्लब, मेस्तवाडा), दुसरे बक्षीस रुपये 30 हजार (ब्रह्मस्थळ संस्थान, पांडुरंगवाडी), तिसरे बक्षीस 2५ हजार रुपये (श्री गजानन युवा मंडळ) यांना अनुक्रमे प्राप्त झाली.

Narakasura Vadh
Narakasura VadhDainik Gomantak
Narakasura Vadh
Goa News: कुठ्ठाळीतील पाणी समस्या सोडविणार- अँथनी वाझ

स्पर्धेतील उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये 10 हजारांची रायझिंग यूथ ऑफ वास्को, सुदर्शन स्पोर्टस क्लब-बायणा, मूंडवेल युवक संघ, शिवप्रासादीक स्पोर्टस् ॲण्ड कल्चरल वल्ब व पॅरामाऊंट बॉयज -भूटेभाट यांना अनुक्रमे प्राप्त झाली. तर उत्कृष्ट श्रीकृष्णसाठी श्रीराम स्पोर्टस अँण्ड कल्चरल क्लब यांना प्राप्त झाले.

आकाशकंदील स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे: प्रथम बक्षीस - रक्षंदा च्यारी, दुसरे - गुंजीता च्यारी, तिसरे - सरीता कट्टीमणी. उत्तेजनार्थ भगवान धावडे, ईशा गोसावी, पवन शिवसागर यांना अनुक्रमे प्राप्त झाली.

या दोन्ही स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या सोबत श्री महालक्ष्मी पूजनोत्सव समितीचे कार्याध्यक्ष शेखर खडपकर, खजिनदार प्रताप गावकर, शैलेश गोवेकर, नगराध्यक्ष लियो रॉड्रीग्स उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक विनोद किनळेकर, हेमंत फडते, उत्सव समितीचे सचिव संतोष खोरजूवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन विनायक घोंगे, संतोष केरकर व प्रकाश गावस यांनी केले. तर आभार प्रदर्शन शैलेश गोवेकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com